आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार अयोध्या दौऱ्यावर, खा. संजय राऊतांकडून घोषणा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण होताच अयोध्येला जाणार आहेत

मुंबई- राज्यातील महाविकासाआघाडी सरकारला 55 दिवस झाले आहेत. अनेकर दिवसांच्या संघर्षानंतर अखेर सरकार स्थिरस्थावर होत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा संजय राऊतांनी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर तिन्ही पक्षातील आमदारांना त्यांची मंत्रीपदे वाटून हे सरकार अखेर कामाला लागले.

या दौऱ्याबाबत शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, "सरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पूर्ण करणारच! प्रभू श्रीरामाची कृपा. सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येस जातील. श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील," असे संजय राऊत म्हणाले. यापूर्वी नोव्हेंबर 2018 मध्ये उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी ते सोबत शिवनेरी किल्ल्यावरील माती अयोध्येत घेऊन गेले होते.

बातम्या आणखी आहेत...