आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाडिया रुग्णालयाला दिला तातडीने ४६ कोटींचा निधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बैठकीत निर्णय

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • निधीमुळे हे रुग्णालय आता नेहमीप्रमाणे रुग्णांच्या सेवेत राहणार आहे
  • मंगळवारी उद्योगपती नस्ली वाडिया हे स्वत: मुख्यमंत्र्यांनी आयोजित बैठकीस उपस्थित होते

मुंबई - लहान मुलांवर वैद्यकीय उपचार करणारे वाडिया रुग्णालय सुरू राहण्याच्या दृष्टीने मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेऊन मध्यस्थी केली. त्यामुळे हे रुग्णालय आता नेहमीप्रमाणे रुग्णांच्या सेवेत राहणार आहे. रुग्णालयासाठी तातडीने ४६ कोटींचा धनादेश देण्यात आला आहे.



महापालिका आणि राज्य शासन हे आवश्यक तो निधी वाडिया रुग्णालयास उपलब्ध करून
देणार असून इतर मुद्द्यांवर येत्या १० दिवसांत निर्णय घेऊन हे रुग्णालय सुरळीतपणे सुरू राहील तसेच यातील कामगार-कर्मचारी यांच्या नोकऱ्यादेखील अबाधित राहतील हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.



मुंबईत गोरगरिबांना आरोग्याच्या सुविधा स्वस्तात देणारे वाडिया रुग्णालय बंद झाले नाही पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी प्रारंभापासून घेतली होती. मंगळवारी उद्योगपती नस्ली वाडिया हे स्वत: मुख्यमंत्र्यांनी आयोजित बैठकीस उपस्थित होते. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त प्रवीण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी व इतर अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांचीदेखील या बैठकीस उपस्थिती होती.