आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 63 वा महापरिनिर्वाण दिन, बाबासाहेब वास्तव्यास असलेल्या परळच्या खोलीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विधानभवनात आदरांजली

मुंबई- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 63 वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्त बाबासाहेब परळच्या ज्या 'बीआयटी' चाळीतील दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक 50, 51 मध्ये राहत असत, त्याठिकाणी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याठिकाणी बुद्धवंदनाही घेण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या खोल्यांमध्ये जाऊन तेथे जतन करण्यात आलेल्या वस्तू तसेच छायाचित्रांचीही माहिती घेतली. बाबासाहेबांच्या वास्तव्यामुळे ही वास्तू एक महत्त्वाचे वारसास्थळ ठरली आहे. त्यामुळे ही वास्तू राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी मंत्री सुभाष देसाई, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे, मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विधानभवनात आदरांजली
 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज विधानभवन येथील त्यांच्या प्रतिमेस विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा डॉ.निलम गोऱ्हे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानसभा सदस्य मंगल प्रभात लोढा, राहूल नार्वेकर, माजी सदस्य तुकाराम बिडकर, राज पुरोहित, विधिमंडळाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भगत, उपसचिव विलास आठवले, सभापतींचे सचिव महेंद्र काज, अवर सचिव सायली कांबळी आदींसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

बातम्या आणखी आहेत...