आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकाॅप्टरने घर पाडले; ‘प्रहार’ने उभारले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - दीड वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकाॅप्टरने उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच ते खाली पडल्याची घटना निलंग्यात घडली होती. या घटनेत मुख्यमंत्र्यांसह सर्वच बचावले. परंतु मैदानाशेजारच्या भरत कांबळे यांच्या घराजवळ हेलिकॉप्टर पडल्याने त्यांच्या घराची चांगलीच पडझड झाली होती. प्रशासनाने त्यावेळी कांबळे कुटुंबीयांची तात्पुरती व्यवस्था केली, परंतु त्यांच्या घराची नुकसानभरपाई त्यांना मिळाली नाही. ही बाब प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांना कळाल्यानंतर त्यांनी पुढाकार घेऊन कांबळेंचे घर दुरुस्त करून दिले. गुरुवारी या घराचा ताबा समारंभपूर्वक कांबळे कुटुंबीयांना देण्यात आला.

 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २६ मे २०१७ रोजी निलंग्याच्या दौऱ्यावर होते. सकाळी त्यांनी हलगरा येथे श्रमदान केले. औराद शहाजानीच्या शासकीय विश्रामगृहावर जेवण घेतले अन् निलंग्यात पोहोचून हेलिकॉप्टरने लातूरकडे निघाले होते. दुपारी त्यांचे हेलिकॉप्टर  निलंगा शहरातील मध्यवस्तीत असलेल्या मैदानातून आकाशात झेपावले. सुमारे शंभर दीडशे फूट उंचीवर पोहोचताच या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. काही क्षणातच ते जमिनीच्या दिशेने वेगाने आले अन् मैदानावर कोसळले. कोसळताना हेलिकाॅप्टरच्या पात्यांचा फटका शेजारीच असलेल्या भरत कांबळे यांच्या घराला बसला. त्यानंतर हेलिकॉप्टरचा काही भागही त्यांच्या घरावर आदळल्याने कांबळेच्या घराची बऱ्यापैकी पडझड झाली होती. 

 

बातम्या आणखी आहेत...