आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chief Of Defence Staff CDS Can Serve Up To Maximum Age Of 65 Years, Govt Amends Rules

चीफ ऑफ डिफेंस स्टाफ 65 वर्षापर्यंत पदावर राहू शकतील, सरकारने सर्व्हिसेसच्या नियमात केले बदल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आर्मी चीफ बिपीन रावत देशाचे पहिले सीडीएस बनू शकतात, मंगळवारपर्यंत सरकारकडून नावाची घोषणा होईल

नवी दिल्ली- चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (सीडीएस) 65 वर्षापर्यंत आपल्या पदावर राहू शकतील. रक्षा मंत्रालयाने नौसेना, वायुसेना आणि लष्कराच्या सर्व्हिस रूलमध्ये काही बदल केले आहेत. आता लष्करपरमुख 62 वर्षे किंवा तीन वर्षांच्या कार्यकाळापर्यंत पदावर राहू शकतील. एखाद्या सेना प्रमुखाला सीडीएस बनवल्यानंतर वयाची अट मध्ये येऊ नये म्हणून संरक्षण मंत्रालयाने नियमांमध्ये बदल केले आहेत.


सीडीएसचा कार्यकाळ किती असेल, याबाबत मंत्रालयाने कोणतीही माहिती दिली नाही. असे मानले जात आहे की, आर्मी चीफ बिपीन रावत देशाचे पहिले सीडीएस असतील आणि याची घोषणा मंगळवारपर्यंत होऊ शकते.

पद सोडल्यानंतर सरकारी किंवा खासगी पद घेऊ शकत नाहीत सीडीएस

कॅबिनेट कमेटीने मंगळवारी सीडीएसच्या पदाला मंजुरी दिली. हे मंत्रालयासाठी मुख्य लष्कर सल्लागार म्हणून काम करतील. सीडीएसने आपले पद सोडल्यानंतर इतर पदावर राहू शकत नाहीत. पद सोडल्यानंतर 5 वर्षापर्यंतही परवानगीशिवाय सीडीएस एखाद्या खासगी पदावरही राहू शकत नाहीत.

4 स्टार जनरलच्या बरोबरीचे असेल सीडीएसचे पद

कॅबिनेट बैठकीत ठरवण्यात आले की, सीडीएसचे पद 4 स्टार जनरलच्या बरोबरीचे असेल. केंद्रीय सूचना प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, सीडीएस सरकारचे प्रधान लष्कर सल्लागार असतील, पण तिन्ही सेनाप्रमुख आपल्या क्षेत्राशी निगडीत प्रकरणांबद्दल मंत्रालयाला सल्ला देऊ शकतील. सीडीएस तिन्ही लष्कराशी संबंधित मुद्द्यांवर सरकार आणि लष्करादरम्यान संपर्क ठेवण्याचे काम करतील. 

बातम्या आणखी आहेत...