आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुरड्याला खाऊ देण्याचे आमिष दाखवून 16 वर्षीय तरुणाने केला अत्याचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- औंढा नागनाथ तालुक्यातील साळणा गोजेगाव येथील सहा वर्षांच्या मुलावर 16 वर्षीय तरुणाकडून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. औंढा नागनाथ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. येथील सामान्य रुग्णालयात पीडित मुलावर शस्त्रक्रिया करून पुढील उपचार चालू आहेत.

 

औंढा नागनाथ तालुक्यातील साळणा गोजेगाव येथे २७ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी बालाप्रसाद सानप याने पीडित मुलाला खाऊ देण्याचे आमिष दाखवून त्याच्या नातेवाइकांच्या घरी नेले आणि त्या ठिकाणी या मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. याबाबत औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर अत्याचाराच्या घटनेनंतर गंभीर जखमी पीडित मुलावर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून पुढील उपचार सुरू आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...