आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलाच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडीओ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भागलपुर : चोरीचा आरोप लावून शुक्रवारी संध्याकाळी 4:00 वाजता दुकानदाराने सातवीच्या विद्यार्थ्याला पहिले बेदम मारहाण केली आणि घरात बांधून ठेवले. त्यानंतर दुकानदाराने असे काही क्रूर काम केले, जे ऐकून प्रत्येकजण सुन्न झाला. प्रत्येकाच्या तोंडात हेच शब्द होते की, एका लहान मुलासोबत तरी असे करायला नको होते. नाजूक स्थितीमध्ये विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले परंतु शनिवारी रात्री 12 वाजता त्याने प्राण सोडले. ही घटना जिल्ह्यातील अमरपूर भागातील आहे. शेतकरी देवेंद्र प्रसाद सिंह यांचा मुलगा नितेशकुमार (14 वर्ष) मध्य विद्यालय कोइंधा येथे सातवीच्या वर्गात शिकत होता.


देवेंद्र यांनी सांगितले की- त्यांचा मुलगा दळण आणण्यासाठी जात होता, तेवढ्यात दुकानदार सुरेश मंडलने नितेशवर दुकानातून बिस्कीट आणि गुटखा चोरी केल्याचा आरोप लावून मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याला विष पाजले. काही लोकांचे असेही म्हणणे आहे की, नितेश दुकानात आल्यानंतर तेथे आणखी एक ग्राहक आला होता. सुरेश मंडलची नात सामान घेण्यासाठी आतमध्ये गेली, ती बाहेर आल्यानंतर नितेश काही पैसे आणि बिस्कीट घेऊन पळत होता. त्यानंतर सोनीने त्याला पकडून आजोबाच्या स्वाधीन केले.


मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
नितीशला झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ काही गावकऱ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. देवेंद्र यांच्यानुसार दुकानदार हा रागीट स्वभावाचा असून यापूर्वीही त्याने अनेक मुलांना अमानुष मारहाण केली आहे. या घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ बांका एसके दास यांनी दुकानदार सुरेश मंडलला अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...