आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कराडजवळ 30 फूट खाेल विहिरीत पडले बालक; वाचवण्याचे प्रयत्न फाेल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - कराडजवळील विंग येथे ३० फूट खोल विहिरीत पडलेल्या १३ वर्षांच्या मुलाला वाचवण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. काही ट्रेकर्सनी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, शेवटी त्याचा मृतदेहच वर काढावा लागला. विंग येथील १३ वर्षीय मुलगा आदित्य बाबू कदम हा विहिरीत पडला हाेता. त्याला बाहेर काढण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. परंतु यश येत नव्हते. अखेर कराड पाेलिसांनी सातारा येथील आमदार छत्रपती 


शिवेंद्रराजे भोसले ट्रेकर्सचे चंद्रसेन पवार व त्यांच्या सहकाऱ्यांना पाचारण केले. ही टीमही तातडीने घटनास्थळी आली. काेणताही माेबदला न घेता त्यांनी विहिरीत उतरून आदित्यला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, ताेपर्यंत बराच उशीर झालेला हाेता. या टीमने आदित्यला वर काढले, मात्र ताेपर्यंत त्याची प्राणज्याेत मालवली हाेती.