आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पोर्ट्स कारच्या ताफ्यानिशी मुलाची अंत्ययात्रा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन : मिसाैरी येथील १४ वर्षीय मुलगा अॅलेक इनग्राम. त्याला स्पाेर्ट॰स कार खूप अावडत. गेल्या अाठवड्यात कर्कराेगाने त्याचा मृत्यू झाला. स्पाेर्ट॰स कारच्या ताफ्यासह माझी अंत्ययात्रा काढली जावी, अशी त्याची अंतिम इच्छा हाेती. साेशल मीडियाच्या माध्यमातून ताे अापले विचार नेहमी व्यक्त करायचा. त्याची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी 'सिडनीज साेल्जर्स अाॅलवेज' नावाच्या संघटनेने त्यास मदत केली. अंत्ययात्रेच्या वेळी २१०० पेक्षा अधिक स्पाेर्ट॰स कार अाणि ७० माेटारसायकलींचे मालक ताफा घेऊन अाले अाणि सिक्स फ्लॅग्ज सेंट लुईस पार्किंगमध्ये एकत्र जमले. कॅलिफाेर्निया, इंडियाना, मिशिगन, फ्लाेरिडा अाणि न्यूयाॅर्कसह देशभरातून स्पाेर्ट॰स कारचे बहुतेक मालक स्वत: कार चालवत अाले, तर काहींनी चालकास पाठवले हाेते. कुणीही अॅलेकला अाेळखत नव्हते. वाहनांचा ताफा जाण्यासाठी मिसाैरी शहरातील वाहतूक दाेन तास बंद ठेवण्यात अाली हाेती. सीएनएनच्या माहितीनुसार मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी 'स्पाेर्ट॰स कार्स फाॅर एलेक'चे अायाेजन करण्यात अाले हाेते. यासाठी कारची व्यवस्था सिडनीज साेल्जर्स अाॅलवेज नावाच्या संघटनेचे प्रमुख दाना क्रिश्चियन मॅनली यांनी केली हाेती. मॅनली यांची ८ वर्षांची मुलगी सिडनी हिचा कर्कराेगाने मृत्यू झाला हाेता. अामच्या संपर्कात जितके कर्कराेग पीडित अाहेत, ते सारे एखाद्या कुटुंबाप्रमाणे राहतात, मदत करतात. अामच्याकडे टर्मिनल अाजाराच्या मुलांची यादी अाहे, त्यामुळे एलेकच्या घरी गेलाे हाेताे अाणि त्याची इच्छा काय अाहे हे अाईला विचारले हाेते. त्यानंतर देशभरातील लाेक कार घेऊन मिसाैरी येथे अाले हाेते. अॅलेकची अाई जेनी इनग्राम या साऱ्या अनुभवाने अतिशय भावुक झाली. तिने अापल्या पाेस्टमध्ये म्हटले, माझा लाडका मुलगा केवळ १४ वर्षे अामच्यासाेबत राहिला. थाेडे दिवस का हाेत नाही अाम्ही अॅलेकचे माता-पिता व्हावेत म्हणूनच अामची निवड केली असावी. त्याच्याशिवाय अाता जगणे अधुरे अाहे, त्याची सतत उणीव भासत असते. २०१५ मध्ये अॅलेकला अाेस्टियाेसारकाेमा झाल्याचे लक्षात अाले. हाडाच्या कर्कराेगाचा हा एक दुर्मिळ प्रकार असताे. चार वर्षे कर्कराेगाशी झुंज देऊन ताे अाम्हाला साेडून गेला. (msn.com)