आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाचत शाळेत जाणारी दुसरीची विद्यार्थिनी आता शाळेच्या नावालाही घाबरते, म्हणते-ते अंकल मला मारून टाकतील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मंदिर मार्ग परिसरात एनपी बंगाली गर्ल्स स्कूलमध्ये गुरुवारी दुसऱ्या वर्गातील चिमुरडीवर बलात्कार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी इलेक्ट्रिशियन राम आसरे (50) बरोबरच शाळेच्या मुख्याध्यापिका संतोष रावत, क्लास टीचर शिखा आणि असिस्टंट इंजिनीअर यांना बेजबाबदार वर्तनासाठी निलंबित केले आहे. त्याशिवाय ज्युनिअर इंजिनीअर सौरभ बिष्टलाही निलंबित केले आहे. राम आसरे सौरभ यांच्या अंडर काम करत होता. 


आरोपीला पाहताच रडू लागली चिमुरडी-म्हणाली अंकल मारून टाकतील 
- शुक्रवारी पोलिस चिमुरडीला घेऊन शाळेत गेले. सर्व कर्मचाऱ्यांना रांगेत उभे करून ओळखायला सांगितले. राम आसरेला पाहताच चिमुरडी रडू लागली, म्हणाली-अंकल मला मारून टाकतील. 
- ओळख पटल्यानंतर आरोपीला न्यायालयीत कोठडीत पाठवण्यात आले आहे. घटनेच्या विरोधात पालकांनी शाळेत निदर्शने केली. सोमवारी पालकांची या प्रकरणी बैठक होणार आहे. 


नाचत शाळेत जायची, आता शाळेच्या नावालाही घाबरते 
- मुलीच्या आजोबांनी सांगितले की, आमची मुलगी हसत शाळेत जायची. पण आता शाळेच्या नावालाही घाबरते, रडू लागते. ती एकच गोष्ट बोलत राहते, मी शाळेत जाणार नाही, अंकल मला मारून टाकतील. त्यांचे संपूर्ण कुटुंबच या धक्क्यात आहे. 


आता पुरुषांना नो एंट्री 
शाळेने एप्रिल 2017 मध्येच शाळेतून पुरुष स्टाफ हटवला होता. त्यात शिक्षक, शिपाई, गार्ड यांचा समावेश होता. पण माळी, इलेक्ट्रीशियन सारखे लोक येत जात होते. या प्रकारानंतर आता पुरुष स्टाफची एंट्री पूर्णपणे बंद केली आहे. खूप गरज असेल तरच सुपरव्हिजनमध्ये पुरुषाला एंट्री मिळेल. काम होताच त्याला शाळेबाहेर केले जाईल. 


फक्त वर्गांमध्ये आहेत कॅमेरे 
एनडीएमसीच्या शाळांमध्ये निगराणीसाठी सध्या फक्त वर्गात आणि वऱ्हांड्यात कॅमेरे लावलेले आहेत. पण आता सगळीकडे सीसीटिव्ही कॅमेरे लावले जाणार आहे. तसेच हेही तपासले जाईल की, एनडीएमसीच्या शाळांची एंट्री आणि एक्झिट गेटवरही सीसीटीव्ही कॅमेरे असतील. 

बातम्या आणखी आहेत...