Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | child harassment in Aurangbad by Mother and lover

प्रेमसंबंधात अडसर झालेल्या चिमुकलीस आई-प्रियकरानेच दिले चटके

प्रतिनिधी | Update - Apr 26, 2019, 10:08 AM IST

आईसह प्रियकरावर पोलिसांनी विनयभंग, पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला

  • child harassment in Aurangbad  by Mother and lover
    औरंगाबाद - अनैतिक नात्यात सतत अडसर ठरत असलेल्या चिमुकलीस आई व आईच्या प्रियकराने गरम भांड्याचे चटके दिल्याचा प्रकार नुकताच समोर आला. आईच्या प्रियकराने चिमुकलीचा चावाही घेतला. यात गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीस रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.
    पैठण तालुक्यातील एक महिला काही दिवसांपासून तिच्या तीन मुलांसह प्रियकर व आरोपी राहुल रावसाहेब पवार (रा. राहुल नगर, कातपूर, ता. पैठण ) याच्यासोबत मुकुंदवाडीत राहत हाेती. पतीला दोन वर्षांपूर्वी अर्धांगवायू झाल्याने तिने घर साेडले व ती राहुलसोबत राहू लागली. राहुलला तिच्या मुलांची अडचण वाटत होती. तीन-चार दिवसांपूर्वी राहुलने तिच्या ५ वर्षीय मुलीस घराबाहेर जाण्यास सांगितले. परंतु तिने ऐकले नाही. याचा राग आल्याने त्याने थेट गॅसवर वाटी ठेऊन ती गरम करत चिमुकलीस चटके दिले. तिच्या चेहऱ्याचा चावा घेतला. तिची प्रकृती खालावल्यानंतर चिमुकलीस २३ एप्रिल रोजी रुगणालयात दाखल करण्यात आले. मुलीचा मामा , काकाने चिमुकलीस विश्वासात घेऊन विचारल्यावर तिने घडला प्रकार सांगितला. त्यानंतर आईसह प्रियकरावर मुकुंदवाडी पोलिसांनी विनयभंग, पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.

Trending