आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Child In Drama, Tried To Play Bhagat Singh In House, Death Due To Hanging

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

12 वर्षीय विद्यार्थ्याने शाळेतील नाटकात घेतला होता भाग, शहीद भगत सिंग यांचे पात्र साकारताना बसला गळफास

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विद्यार्थ्याला नाटकात इंग्रज शिपायाचे पात्र मिळाले होते, पण नंतर घरात भगत सिंग यांचे पात्र साकारताना झाला अपघात

मंदसौर(मध्य प्रदेश)- येथील एका खासगी शाळेच्या वार्षिक उत्सवातील नाटकाची प्रॅक्टीस करताना एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रियांशू नावाच्या विद्यार्थ्याने शहीद भगत सिंग यांच्या नाटकात इंग्रज शिपायाचे पात्र साकारत होता. पण, दुसऱ्या दिवशी रविवारी तो भगत सिंग यांचे पात्र साकारण्याचा प्रयत्न करू लागला आणि यात फासावर देण्याच्या सीनदरम्यान प्रियांशूला फास बसला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी सांगितले की, प्रियांशु ज्ञानसागर नावाच्या शाळेत शिकत होता. तो आपल्या शेतातील घरात आपल्या नाटकाच्या तालमीचा व्हिडिओ बघत होता. यादरम्यान त्याने भगत सिंग यांचे पात्र साकारण्यासाठी त्यांना फासावर देण्याचा सीन करुन पाहत होता. यावेळी त्याने दोरी बांधली आणि आपल्या पलंगावर उभा झाला. यादरम्यान तो पलंगावरुन सटकला आणि दोरीवर फास लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. थोड्या वेळानंतर प्रियांशुचे काका भारत लालने त्याला पाहीले, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांना घटनास्थालवर एक मोबाईल आढळला, ज्यात प्रियांशूच्या नाटकाचा व्हडिओ सुरू होता.