आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्त अधिकारी शोधत होता कोट्यवधीच्या संपत्तीसाठी वारस, आरोपींनी लढवली ही शक्कल; स्वतःचा मुलगा सांगत अधिकाऱ्याकडून उकळले लाखो रूपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मोगा (पंजाब) : पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी अपहरण केलेल्या मुलाला कपूरथला येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी याबाबत दोन महिलांसोबत 4 जणांना अटक केली असून एक जण फरार आहे. पोलिसांनी मुलाला आई-वडिलांकडे सुपूर्द केले. आरोपींनी खोटे दत्तकपत्र तयार करून मुलाला कपूरथला येथील दलबीर सिंह यांना दीड लाख रूपयांना विकले होते. दलबीर यांच्याकडे कोट्यवधीची संपत्ती आहे. पण दोन मुले, एक सून आणि नातवाच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीला कोणीही वारस नव्हता. आपल्या संपत्तीला वंशज भेटावा यासाठी ते मुलाला दत्तक घेऊ इच्छित असल्याचे सांगितले जाते. आरोपींनी तो मुलगा त्यांचा आहे असे सांगत त्याला दत्तक देण्यासाठी दीड लाख रूपये उकळले होते. 


सीसीटीव्हीमध्ये कैद झाले अपहरणकर्ते

एसएसपी गुलनीत सि़ंह खुराना यांनी सांगितले की, एक महिला आणि पुरुषाने 24 डिसेंबरला दाना मंडी येथील झुग्गी-झोपड़ी येथून संध्याकाळी 5 वाजता मुलाचे अपहरण केले होते. माहिती मिळताच एसएचओ गुरप्रीत सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम तयार करण्यात आली. टीमने परिसरातील सीसीटीव्हीचे फूटेज चाळण्यास सुरुवात केली असता त्यांना डीएल-1 जेडवी-3259 क्रमांकाच्या होंडा इमेज कारमधून आरोपी मुलाचे अपहरण करत असल्याचे दिसून आले. नंतर एक-एक सुगावा लावत चार आरोपींना अटक करण्यात येऊन मुलाला ताब्यात घेतले. 

 

संपत्तीसाठी शोधत होते वारस

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मार्कफॅड मधून निवृत्त झालेले अधिकारी दलबीर सिंह तीन बंगल्यांचे मालक आहेत. काही वर्षांपू्र्वी त्यांचे दोन मुले, सून आणि 8 वर्षीय नातूचे निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर दलबीर यांच्या दुसऱ्या सुनेने दुसरा विवाह केला. यामुळे दलबीर यांच्या संपत्तीला आता कोणी वारस नव्हता. त्यामुळे तो एक वारस दत्तक घेऊ इच्छित होते. याबाबत दलबीर यांनी आपल्या बंगल्यात किरायाने राहणाऱ्या कुलविंदर कौर यांच्याकडे विचारणा केली होती. यावर मुलगा दत्तक देण्यासाठी दीड लाख रूपये देण्याचे सांगितले होते. यानंतर कुलविंदर कौरने मावस भाऊ लखविंदर सिंह याच्यासोबत बोलले असता, सर्वांनी मुलाचे अपहरण करून दलबीर यांना देण्याचा आणि आपापसात पैसे वाटून घेण्याची योजना आखली. आरोपींनी ठरल्याप्रमाणे मुलाचे अपहरण करून दुसऱ्या दिवशी 25 डिसेंबरला दलबीर सिंह यांच्याकडे सुपूर्द केले. 

 

बातम्या आणखी आहेत...