आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

चाइल्ड पाेर्नाेग्राफी व्हिडिओ नाशिकमधूनही अपलाेड, १८ लिंकची शहर पाेलिसांना माहिती मिळाल्याने तपासाला वेग

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नीलेश अमृतकर, संजय भड 

नाशिक - देशभरात सध्या चर्चेत असलेल्या व विविध शहरांत गुन्हे दाखल हाेत असलेल्या चाइल्ड पाेर्नोग्राफी प्रकरणात आता नाशिकमधूनही काही जणांना लवकरच पाेलिस ताब्यात घेणार आहेत. नाशिकमधून १८ लिंकची चाइल्ड पाेर्नाेग्राफीसंदर्भातील माहिती पाेलिस महासंचालक कार्यालयाकडून शहर पाेलिसांना मिळाली असून आतापर्यंत तीन गुन्हे दाखल झाले असून इतरांचा शाेध सायबर क्राइमने सुरू केला आहे. ज्या लॅपटाॅप, माेबाइलद्वारे हे व्हिडिआे अपलाेड झाले किंवा ते पाठवले गेले, त्यांच्या या लिंक असून त्यांचा सखाेल तपास करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या गृह विभागाने देशभरात महिला, मुलींवरील अत्याचार राेखण्यासाठी चाइल्ड पाेर्नाेग्राफीवर बंदीचा विचार सुरू केला आहे. त्यातच फेसबुककडून अधिकृतपणे मिळवलेल्या माहितीनुसार, राज्याच्या पाेलिस महासंचालकांना चाइल्ड पाेर्नाेग्राफीचे व्हिडिआे प्रसारित करणाऱ्या व व्हिडिआे बनवणाऱ्यांवर कारवाईचे आदेश आणि संशयितांची यादीदेखील देण्यात आली आहे. यामध्ये नाशिकच्या १८ संशयितांचा समावेश असल्याची धक्कादायक बाब समाेर आली आहे. याअनुषंगाने पाेलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पाेलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे. 

तीन संशयितांचा शाेध :


पहिल्या टप्प्यात तीन संशयितांचा शाेध लावण्यात सायबर पाेलिसांना यश आले असून संबंधितांविरुद्ध माहिती व तंत्रज्ञान अधिनियमाचे उल्लंघन (आयटी अॅक्ट) ६७ (ब) अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. या तिन्ही गुन्ह्यांतील संशयित आराेपी निष्पन्न झाले आहेत. या संशयितांना अटकेपूर्वी कायद्यातील तरतुदीनुसार ४१ (अ) अन्वये नाेटिसा बजावण्यात आल्या आहेत. 

 

महाविद्यालयीन तरुण, नाेकरदाराचा समावेश :


प्रथमदर्शनी त्यांचे माेबाइल व लॅपटाॅपची तपासणी करण्यात आली असून त्यांच्याकडे फेसबुकवर लिंक पाठवून व्हिडिआे प्राप्त झाले. त्यांनी ते इतरत्र पाठवल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, त्यांच्याकडे तपासणीदरम्यान असे व्हिडिआे आढळून आलेले नाहीत. या तिघांमध्ये दाेघे महाविद्यालयीन तरुण, तर एक नाेकरदार व्यक्ती असल्याचे समाेर आले आहे. त्यांना या कायद्याबाबत व अशा प्रकारचे व्हिडिआे पाहणे अथवा प्रसारित करण्याला कायद्याने मनाई असल्याची माहिती नसल्याचे त्यांनी जबाबात म्हटले आहे. तरी त्यांच्याविराेधात कारवाई सुरू असल्याची माहिती सायबर गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक देवराज बोरसे यांनी दिली.आतापर्यंत राज्यात ३५ गुन्हे दाखल

चाइल्ड पोर्नाेग्राफीच्या संदर्भाने राज्यात आतापर्यंत ३५ गुन्हे दाखल झाले असून यात मुंबई-२, चंद्रपूर-६, आैरंंगाबाद- ३, काेल्हापूर-२, नाशिक-३, बीड - २, अमरावती ग्रामीण ३, पुणे-३ आणि चिंचवड, रायगड, गाेंदिया, परभणी, ठाणे ग्रामीण आणि साेलापूरमधून ११ गुन्हे दाखल झाले आहेत.काेणते गुन्हे दाखल हाेतात?

पाेस्काे  
> कलम-१४ - पाेर्नाेग्र्राफीच्या उद्देशाने मुलांचा वापर करणे.
> शिक्षा- कमीत कमी पाच वर्षे तुरुंगवास.
> कलम -१५ : चाइल्ड पोर्नाेग्राफीचे व्हिडिआेज्, फाेटाेज् स्टाेअर करून ठेवणे.
> शिक्षा - कमीत कमी १ हजार रुपयांचा दंड 

आयटी अॅक्ट 

> कलम ६७ (ब) मुलांना कामाेत्तेजित करण्याच्या दृष्टीने अश्लील साहित्य प्रसिद्ध करणे किंवा हस्तांतरित करणे.

> शिक्षा- पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि पाच-दहा लाखांपर्यंतचा दंड

आणखी १५ रडारवर

पाेलिस महासंचालक व सायबर गुन्हे शाखेच्या महासंचालकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाशकात १८ संशयितांनी चाइल्ड पाेर्नाेग्राफीच्या लिंक, िव्हडिआे इतरांना प्रसारित केल्याचे उघडकीस आले आहे. या संशयितांचा शाेध सुरू असून तीन गुन्हे दाखल केले आहेत. उर्वरित १५ संशयित रडारवर आहेत. तरी चाइल्ड पाेर्नाेग्राफीबाबत शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती हाेणे आवश्यक आहे. त्यासाठी पाेलिसांबराेबरच सर्वच सामाजिक घटकांनी प्रबाेधनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
- विश्वास नांगरे-पाटील, पाेलिस आयुक्त

0