आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइलवर कार्टून दाखवतो म्हणत परळी तालुक्यात अल्पवयीन भावंडांवर नराधमाने केला लैंगिक अत्याचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी - मोबाइलमध्ये कार्टून दाखवण्याचे आमिष दाखवून ५ वर्षांच्या मुलासह त्याच्या ३ वर्षांच्या बहिणीवरही एका तरुणाने अत्याचार केल्याची घटना परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथे शुक्रवारी घडली. या प्रकरणी शनिवारी पहाटे पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली. 

कन्हेरवाडी येथील बाबासाहेब ज्ञानोबा चौरे (१९) हा तरुण परळीतील मोंढ्यावर राेजंदारीवर काम करतो. कन्हेरवाडीत शेजारी राहणारे ५ वर्षीय मुलगा व त्याची ३ वर्षीय बहीण शुक्रवारी घरासमोर खेळत हाेते. तुम्हाला मोबाइलमध्ये कार्टून दाखवतो म्हणत बाबासाहेब याने दोघांना आपल्या घरात बोलावले. अाधी त्याने ३ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केला. त्यानंतर ५ वर्षीय मुलावरही अनैसर्गिक अत्याचार केला. मुलांनी त्यांच्या आजीला हा प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 


बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार या प्रकरणी गुन्हा नोंद झाला. बाबासाहेब चौरेला शनिवारी पहाटे अटक झाली. अंबाजोगाई न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

बातम्या आणखी आहेत...