आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालनिरीक्षणगृह अधीक्षिका नलिनी पाटील यांना लाच घेताना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- बालनिरीक्षणगृहाच्या अधीक्षिका नलिनी काशीनाथ पाटील अाणि लिपिक प्रशांत उत्तम देसले या दोघांना कॅरम स्वरुपाच लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. उंटवाडी येथील निरीक्षणगृहाच्या कार्यालयात मंगळवारी (दि. २१) दुपारी तीनला ही कारवाई केली. मुंबईनाका पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराने बाल न्यायमंडळ यांच्या आदेशाने बालनिरीक्षणगृह येथे मुलाला दाखल केले होते. त्यास बालन्याय मंडळ कोर्टातून जामीन करून घेण्यासाठी बालसुधारगृह अधीक्षकांकडून 'पीओ लेटर' देण्यासाठी व जामीन मिळाल्यानंतर मुलास सोडवण्यासाठी अधीक्षिका नलिनी पाटील व लिपिक प्रशांत देसले यांनी तक्रारदाराकडे कॅरम बोर्डची मागणी केली हाेती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पथकाने मंगळवारी सापळा रचत नलिनी पाटील व प्रशांत देसले या दोघांना तक्रारदाराकडून कॅरम बोर्ड स्विकारताना रंगेहाथ पकडले. वरिष्ठ निरीक्षक मृदुला नाईक यांच्या पथकाने ही कारवाई केली. वात्सल्य निरीक्षणगृहात कार्यरत असताना वरिष्ठ पाटील यांच्यावर नाराज होते. त्यांची ठाण्याला बदली करण्यात आली होती. 

बातम्या आणखी आहेत...