ओव्हरटेक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीमुळे स्कूल व्हॅनच्या खिडकीतून बाहेर डोकावणाऱ्या चिमुकल्याचे शीर धडापासून वेगळे झाले


हा भीषण अपघात कुरूक्षेत्रमध्ये झाला. व्हॅन मालकाने केले पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न
 

दिव्य मराठी

Apr 17,2019 03:10:00 PM IST

कुरुक्षेत्र(हरियाणा)- ओव्हरटेक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीमुळे शाळेच्या व्हॅनमधून बाहेर डोकावणाऱ्या KG च्या वर्गात शिकत असलेल्या चिमुकल्याचे शीर धडापासून वेगळे झाले. त्याच्या मानेवर इतका जोरात आघात झाला की, त्याचा तडफडून मृत्यू झाला. अॅक्सीडेंट मंगळवारी मिर्झापूर गावाजवळ झाला.


- बारवा गावात राहणारा 5 वर्षीय अक्षत रोजप्रमाणे शाळेत जात होता. चिमुकल्याच्या मृत्यूची माहिती मिळताच गावकरी आक्रमक झाले. गावातील सरपंच आणि इतर लोक हॉस्पीटलला गेले.

- गावकऱ्यांचा आरोप आहे की, घटनेनंतर ड्रायव्हरने शाळेच्या मदतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

X