आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माझ्या नातवाची बालवाडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘जी आवडते मज मनापासुनी शाळा, लाविते लळा जसा माउली बाळा’ प्र. के. अत्र्यांची ही कविता आजही माझ्या ओठात तशीच आहे. तीच भावना माझ्या शाळेसाठी आज 40 वर्षांनंतर आहे. तशीच राहणार आहे. अशा शाळा आज अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या असतील. शाळा खूप आहेत, पण विद्यार्थ्यांना आपलेपण वाटते का, या प्रश्नाचे उत्तर हो असेलच असे नाही. पण माझ्या तिस-या पिढीतल्या नातवाची अशीच एक शाळा मी पाहिली, अनुभवली आहे, जी बालकांचा सर्वांगीण, शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास करण्यावर भर देते. या शाळेने मुलांच्या बौद्धिक विकासाबरोबरच शरीराच्या स्नायूंचा, वयाचा, त्याच्या सामाजिक जाणिवेचा, निकोप स्पर्धेचा विचार केलेला आहे. लहान वयातच मीपेक्षा आम्ही ही व्यापक कल्पना त्यांच्या मनात रुजवली. त्यामुळे त्यांच्या पातळीवरील विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील प्रयोग ते धिटाईने सांगतात. करून दाखवतात. प्रत्येक सण सामूहिकरीत्या शाळेत साजरा करण्यात येतो. सर्व विद्यार्थी शालेय उपक्रमात पालकांसह उत्साहाने सहभागी होतात. आजी-आजोबांनासुद्धा नातवाच्या उपक्रमात सहभागी करून घेतात. आज कितीतरी पालक स्पर्धेच्या काळजीने आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात. इंग्रजी माध्यम स्वीकारल्याने व्यक्तिमत्त्वाचा विकास होतोच असे नाही. असे किती पालक आहेत जे मुलांचा गृहपाठ स्वत: घेऊ शकतात. आज कुणाकडेही वेळ नाही. मातृभाषेचे माध्यम आत्मविश्वास देणारे असते, पण पालक केवळ सामाजिक प्रतिष्ठेपायी आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालतात. शिक्षण हेच की जे बौद्धिक व सामाजिक स्तरावर आत्मविश्वास निर्माण करते. या दृष्टीने ओंकार बालवाडीचे कार्य विशेष कौतुकास्पद आहे. यासाठी त्यांचे संचालक मंडळ व शाळेतील सर्व शिक्षकवृंद अभिनंदनास पात्र आहेत.