आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- वंशाचा दिवा तेवत ठेवण्यासाठी पत्नीच्या पोटात अर्भक तयार होत नसल्याने एका व्यक्तीने बेकायदेशीर मार्ग अवलंबल्याची घटना घडली आहे. त्याने रेल्वे स्टेशनवर पहाडगंज परिसरातील वेटींग रुममध्ये प्रतीक्षा करणाऱ्या एका महिलेच्या 4 वर्षाच्या मुलाचे अपहरण केले. त्यानंतर त्याने अपहरण केलेल्या मुलाला राजस्थानमध्ये आपल्या भावाच्या घरी सोडून तो परत दिल्लीला आला. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून अपहरण केलेल्या मुलाचा तपास करुन त्याला आपल्या ताब्यात घेतल्याची माहीती पोलिसांनी दिली आहे. आरोपी विद्या भूषण (वय25) उर्फ राजु बिहारमधील सीवानचा रहिवासी आहे.
महिलेची पर्स चोरी गेल्यानंतर ती मदत मिळण्यासाठी करत होती प्रतीक्षा
रेल्वे पोलीस उप-अधीक्षक दिनेस कुमार गुप्ता यांनी सांगितल्यानुसार, सकीना बेगम (वय 27) ही महिला जयपूरची रहिवासी आहे. ती 17 नोव्हेंबरला जयपूरला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर पोहचली होती. तिथे तिची पर्स चोरी झाल्यामुळे ती पहाडगंज परिसरातील वेटिंग रुममध्ये पोलिसांकडून मदत मिळण्याच्या आशेने प्रतीक्षा करत होती. तिथे सायंकाळी 7.45 च्या सुमारास आरोपी विद्या भुषण अगोदरच वेटिंग रुममध्ये बसला होता. दोघांमध्ये बोलचाल झाली. त्यानंतर सकीनाने त्याला आपली आपबीती सांगितल्यानंतर त्याने तिला जेवन आणुन दिले. सकीनाचा मुलगा रडत असल्याने विद्या भुषण त्याला बिस्कीट घेऊन देण्याचे बहाणे करुन बाहेर घेऊन गेला. बराच वेळ झाल्याने सकीनाने दोघांचा शोध घेतला परंतू विद्या भुषण मुलाला घेऊन पसार झाल्याचे तिला समजले. त्यानंतर तातडीने सकीनाने रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई सुरू केली.
मुलाचे अपहरण करुन बिहारमध्ये घेऊन जाणयाची योजना
तपास करत असताना पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेराचे फूटेज तपासले. परंतू पुरावे न सापडल्याने त्यांनी ऑटो ड्रायव्हरपासून ई-रिक्शा चालकांकडे चौकशी केली. या चौकशीत एक ई-रिक्शा ड्रायव्हरने विद्या भुषणला मदत केल्याचे समोर आले. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीला आरके आश्रम येथून अटक केली. आरोपीने मुलाचे अपहरणाची जबाबदारी स्विकारली. त्यानंतर माहितीप्रमाणे पोलिसांनी राजस्थानमधील आरोपीचा भाऊ खाटू श्याम याच्या घरुन मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सांगितल्यानूसार, आरोपी विद्या भुषणला एक मुलगी आहे. पत्नीच्या आजारामुळे तिच्या पोटात अर्भक तयार होत नव्हते. त्यामुळे मुलाच्या मोहापायी आणि वंशवारसा पुढे घेऊन जाण्यासाठी विद्या भुषणने मुलाचे अपहरण केल्याचे कबूल केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.