International Special / 10 ते 14 वयोगटातील मुले कार चोरून रोड ट्रिपवर निघाले, पोलिसांनी 1 हजार किलोमीटर दूरवर जाऊन पकडले


पोलिसांना करावी लागली कठोर मेहनत

दिव्य मराठी वेब

Jul 16,2019 02:10:00 PM IST

मेलबर्न- ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये 10 ते 14 वयोगटातील चार मुले कार घेउन देश फिरण्यासाठी निघाले. मुलांनी ही ट्रिप न कळत नाही तर, विचारपूर्वक केली. सगळ्यांनी ट्रिपला पिकनिकप्रमाणे प्लॅन केले. यासाठी त्यांनी घरातून पैसे आणि गरजेचे सामने घेतले. यानंतर त्यांनी गाडी चोरून ट्रिपवर निघाले, पण पोलिसांनी त्यांना 1 हजार किलोमीटर दूर न्यू साउथ वेल्सजवळ ग्राफ्टनमध्ये पकडले.

पोलिसांनी सांगितले की, पकडलेल्या मुलांमध्ये तीन मुले आणि एक मुलगी आहे. यातील एका मुलाचे वय 14 वर्षे, दोघांचे 13 आणि एका मुलीचे वय 10 वर्षे आहे. एका मुलाने ट्रीपवर जाण्याआधी घरात पिकनिकला जात असल्याची चिठ्ठी सोडली. यानंतर पोलिसांना मुलांच्या या कृत्याची माहिती मिळाल्यावर, त्यांनी मुलांचा शोध सुरू केला.


पोलिसांना करावी लागली कठोर मेहनत
न्यू साउथ वेल्स पोलिसांनी सांगितल्यानुसार, मुलांच्या गाडीची माहिती त्यांना बनाना शहरात मिळाली. या शहरात त्यांनी पेट्रोल चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्यांना थांबवल्यावर मुलांनी स्वतःला गाडीद बंद केले. यानंतर मेकॅनिकच्या मदतीने गाडीची काच फोडून त्यांना बाहेर काढण्यात आले. अद्याप मुलांवर कोणते आरोप लावले त्याची माहिती मिळाली नाहीये.

मुलांनी दोन दिवस गाडी चालवली
डिस्ट्रिक्ट पोलिस इंस्पेक्टर डॅरेन विलियम्सने मीडियाला सांगितले की, गाडी शुक्रवारी चोरी झाली होती. दोन दिवस गाडी कोणी चालवली याची माहीती मिळाली नाहीये, पण असा अंदाज आहे की, दोन मुलांनी बारी-बारीने स्टेअरींक सांभाळून गाडी चालवली असावी.

X
COMMENT