आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मस्ती-मजामध्ये चिमुकल्याने केली 28 हजारांची ऑनलाइन शॉपिंग, अमेझॉन एलेक्साच्या मदतीने मागवल्या खेळण्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खेळण्या घरात आल्यावर मुलांच्या आईला वाटले नातेवाईकांनी पाठवले आहे

न्यूयॉर्क- इंटरनेटच्या युगात गूगल वॉइस आणि एलेक्सासारखे प्लॅटफॉर्म सोप्या पद्धतीने आदेशाचे पालन करतात. अमेरीकेतील राज्य मिशिगनच्या स्टर्लिंग हाइट्स शहरात राहणाऱ्या वेरोनिका एस्टिलेच्या मुलांनी काही दिवसांपूर्वी असेच केले. दोन्ही चिमुकल्यांनी अमेझॉन एलेक्साच्या मदतीने 400 डॉलर (साडे 28 हजार रुपये) ची शॉपिंग केली.मुलांची आई वेरोनिकाला याबाबत तेव्हा कळाले, जेव्हा शॉपिंग ऑर्डर घरी येऊ लागल्या. सुरुवातील त्यांना वाटले की, क्रिसमस असल्यामुळे नातेवाईकांनी पाठवले आहेत. पण, बॉक्सवर कोणाचेच नाव नसल्यामुळे आईला संशय आला. त्यानंतर तिने आपले मुल एरिस आणि कॅमरनला याबाबत विचारल्यावर त्यांनी ही शॉपिंग केल्याचे सांगितले.

एलेक्साच्या मदतीने बोलून ऑर्डर केल्या जातात

एलेक्साच्या मदतीने ग्राहक बोलून अमेझॉनवरुन कोणत्याही वस्तु ऑर्डर करू शकतात. यात पासवर्ड आणि सेक्योरिटी असते, पण वेरोनिकाने पासवर्ड न ठेवल्यामुळे मुलांनी वस्तु घेतल्याचे सांगितले जात आहे.