आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FM चा आवाज वाढवून डोक्यात हतोडी घातली, रक्ताच्या थारोळ्यात सुनेला पाहून सासू झाली बेशुद्ध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर - युपीमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी बर्रा परिसरात राहणाऱ्या 37 वर्षीय महिलेची डोक्यात हतोडी घालून हत्या करण्यात आली. हे खळबळजनक हत्याकांड घडवताना हल्लेखोरांनी महिलेची किंकाळी कोणी ऐकू नये म्हणून FM रेडिओचा आवाज वाढवला होता. हत्या चोरीसाठी करण्यात आली की इतर काही कारणासाठी याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. आईच्या मृत्यूनंतर तिच्या दोन मुलींना जबर धक्का बसला आहे. या मुली वारंवार आई हवी असल्याचे सांगत रडत आहेत. 


संजय कुमार ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये काम करतात. त्यांच्या कुटुंबामध्ये मृत पत्नी पुष्पा (37) आणि दोन मुली सोनल तसेच सौम्या आहेत. सोमवारी सकाळी संजय कुमार कामावर गेले होते. तर मुली शाळेत गेलेल्या होत्या. मृत महिला घरातील कामे उरकत होत्या. त्याचवेळी ही घटना घडली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे समोर आले आहे की, दुपारी 12 वाजता गुंड घरात घुसले असावेत. मत महिलेच्या सासू रिना आल्या त्यावेळी याबाबक माहिती मिळाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुनेला पाहून त्या घाबरल्या आणि नंतर बेशुद्ध झाल्या. 


मृत महिलेच्या मुली शाळेतून घरी आल्या तेव्हा वडिलांनी त्यांना बाहेरच थांबवले. त्या वारंवार आईला भेटायचे असल्याचा हट्ट करत होत्या. पण वडिलांनी त्यांना बाहेरच अडवले. आईच्या हत्येबाबत समजल्यानंतर छोटी मुलगी तर बेशुद्ध झाली. पोलिसांचे श्वान काही अंतरावर असलेल्या अजय पांडे यांच्या घराजवळ जाऊन थांबले. पोलिसांनी सांगितले की, अजय टाइल्स लावण्याचे काम करतात. 15 दिवसांपूर्वीच मृत महिलेच्या घरातही त्यांना टाइल्स लावले होते. पोलिसांनी अजयला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पण त्यांच्या जुने काही वैर नसल्याचे समोर आले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...