आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई आंघोळीला गेली असताना 5 मजली उंच इमारतीच्या रेलिंगवर अशी चालत होती चिमुकली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोशल मीडियावर युझर्सनी त्या चिमुकलीच्या पालकांबद्दल नारीज व्यक्त केली आहे

तेनरिफ- स्पॅनिश बेट तेनरीफच्या प्लाया पॅराइसोच्या एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील रेलिंगवर 4 वर्षीय चिमुकलीच्या फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात चिमुकली बालकनीतून रेलिंगवर येते आणि एका रुमच्या खिडकीजवळ जाऊन परत बालकनीत जाताना दिसत आहे.या घटनेच्या व्हिडिओ शेजारील इमारतीमधील एका व्यक्तीने बनवला आहे. याबाबत तो व्यक्ती म्हणाला की, "मी व्हिडिओ बनवत होतो, तेव्हा माझ्या काळजाचा थरकाप उडत होता. चिमुकलीचा थोडाजरी तोल गेला असता तर ती खाली पडली असती." पूर्ण व्हिडिओ 14 ते 15 सेकंदाचा आहे. त्या वेळेस आई आंघोळ करत होती

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा चिमुकली रेलिंगवर चालत होती, तेव्हा तिची आई घरात आंघोळ करत होती. या क्लिवला तेनरीफ सोसायटीच्या फेसबूक पेजवर OMG! कॅप्शनसोबत शेअर करण्यात आले आहे. सोशल मीडियावर युझर्स पालकांबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत.