आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 वर्षीय मुलाने लग्नातून चलाखीने लंपास केला लाखोंचा ऐवज, कोणाला संशय येऊ नये यासाठी वापरली वेगळी पद्धत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पानीपत - भाई लालोजी गुरूद्वारामध्ये रविवारी लग्नसमारंभात आलेल्या एका 14 वर्षीय मुलाने 4 लाख रूपये कॅश आणि दागिन्यांनी भरलेली बॅग लंपास केली आहे. तो बॅगसाठी जवळपास 4 तासांपासून वधूच्या काकांचा पाठलाग करत होता. आधी घरी मग नंतर पाठलाग करत गुरुद्वारामध्ये गेला. काकांचे लक्ष विचलित झाल्याबरोबर त्याने संधी साधत बॅग लंपास केली. गुरुद्वाराच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये आरोपी बॅग घेऊन जाताना दिसत आहे. त्यानंतर लग्नाच्या फोटो आणि व्हिडीओमध्ये तो दिसला आहे. 

 

सोबतीला होते साथीदार

> आरोपी मुलासोबत साथीदारांचा यामध्ये सहभाग होता. गुरुद्वाराच्या बाहेर उभा असलेला एक साथीदार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. काकाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यासाठी कुटूंबीयांनी पोलिसांना पुरावा म्हणू आरोपीचे फोटो दिले आहेत.

 

हुंड्यासाठी होता ऐवज
> न्यू रमेशमध्ये राहणाऱ्या जोगेंद्र सिंहने सांगितले की, रविवारी त्यांची पुतणी सुखजीतचे गुरुद्वारामध्ये लग्न झाले. बॅगमध्ये 4 लाख 1100 रूपये रोख, दोन तोळ्याची एक चैन आणि एका तोळ्याची एक अंगठी होती. विवाहानंतर हे सर्व सुखजीतला देण्यात येणार होते. लग्नादरम्यान ते गुरुद्वारामध्ये बॅग ठेवून वर-वधूला आशीर्वाद देण्यासाठी गेले. परत आल्यावर बघितले तेव्हा बॅग त्या ठिकाणावरून गायब होती. यामुळे लग्नात मोठी गोंधळ उडाला होता. 


परिवारासोबत फिरत होता आरोपी
> नवरीचा भाऊ हरप्रीने सांगितले की, आरोपी 9:30 वाजता घरी होता. नंतर सर्वांसोबत गुरुद्वारामध्ये आला होता. कोणाला संशय येऊ नये यासाठी आरोपी सुटा-बुटात आला होता. गुरुद्वारामध्ये सर्वजण पगटी बांधून होते. पण त्याने एकट्यानेच डोक्याला रूमाल बांधून होता. 1 ते 1:15 दरम्यान जोगेंद्र आशीर्वाद देण्यासाठी गेले तेव्हा आरोपीने हात साफ केला. 


आरोपींचा शोध सुरू
> जोगेंद्र यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोटोच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असून लवकरच आरोपीला ताब्यात घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

बातम्या आणखी आहेत...