आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Children Waiting For School Bus, Attacked With Knife, Girl Student Among 2 Dead, 18 Injured In Japan

स्कूल बसची वाट पाहत असलेल्या मुलांवर माथेफिरूने केला चाकू हल्ला; एका मुलीसहीत दोघांचा मृत्यू तर 18 जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो(जापान)- जापानच्या कावासाकी शहरात मंगळवारी सकाळी बस स्टॉपवर एका माथेफिरू युवकाने अचानक लोकांवर चाकू हल्ला केला. या घटनेत एक चिमुकली आणि एका 30 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे, तर 18 जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेच्या वेळी प्रायमरी गर्ल्स स्कुलच्या विद्यार्थी, टीचर आणि इतर लोक बस स्टॉपवर बसची वाट पाहात होते. 57 या हल्ल्यानंतर आरोपीने स्वतःवरही वार केला, त्याचाही मृत्यू झाला आहे.


फायर डिपार्टमेंटच्या प्रवक्त्याने सांगितले की, सकाळी अंदाजे 7.44 वाजता एक इमरजंसी फोन आला होता. सांगितल्या गेले की, एका माथेफिरू तरूणाने अचानक लोकांवर चाकू हल्ला केला आहे. पोलिसांना येताना पाहून त्याने स्वतःवरही वार केले आणि त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. तुर्तास आरोपीची ओळख पटली नाहीये.


बस स्टॉपवर होत्या मुली
अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, ही घटना त्या वेळी झाली जेव्हा मुली आणि टीचर बस स्टॉपवर बसची वाट पाहत होते. हे सगळ्या मुली एकाच लाइनमध्ये थांबले होते, यावेळी मुलांसोबतच आरोपीने इतर लोकांवरही हल्ला चढवला. विद्यार्थ्यांमध्ये जास्त करून मुली होत्या. तसे पाहायला गेले तर जापान जगातील सगळ्यात कमी हिंसा करणाऱ्या देशांपैकी एक आहे. त्यामुळे या हल्ल्यानंतर सर्व स्तरावरून हळ-हळ व्यक्त होत आहे.