आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chilean Military Plane With Passengers And Crew On Board Disappears On Route To Antarctica

चिलीच्या चाबुंकोवरुन अंटार्कटिकाला जात असलेले सैन्य विमान बेपत्ता, 38 जण विमानात होते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विमानात 17 क्रू मेंबर्स आणि 21 प्रवासी

सँटियागो- चिलीवरुन अंटार्कटिकला जात असलेले एक सैन्य विमान सोमवारी रात्री अचानक बेपत्ता झाले. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, मिल्ट्रीच्या सी-130 हरक्यूलिस ट्रांसपोर्ट एअरक्राफ्टने  सोमवारी संध्याकाळी चिलीच्या चाबुंको मिल्ट्री बेसवरुन अंटार्कटिकामधील एडुअर्डो फ्रेइ मोंटालवा एअरबेसकडे उड्डाण घेतली.
दरम्यान, अचानक या विमानाचा संपर्क तुटला. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार विमानात 17 क्रू मेंबर्स आणि 21 प्रवासी होते. चिलीच्या वायुसेनेने सांगितल्यानुसार, विमानाला शोधण्यासाठी एक रेस्क्यू टीम बनवली आहे. एअरक्राफ्ट रूटीन सपोर्ट आणि मेंटनंस मिशनवर निघाले होते.