आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली सचिवालयात मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर फेकली मिरचीपूड, आपचा भाजपवर आरोप, आरोपीला अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर एका व्यक्तीने सचिवालयातच मिरचीपूड फेकल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये केजरीवालांना झालेल्या धक्काबुक्कीत त्यांचा चष्मा खाली पडला. पोलिसांनी लगेचच घटनास्थळी हल्लेखोराला अटक केली आहे. त्याने स्वतःची ओळख अनिल कुमार हिंदुस्तानी अशी सांगितली आहे. पोलिस सध्या आरोपीची चौकशी करत आहेत. 

 

आम आदमी पार्टीने या घटनेनंतर केलेल्या ट्वीटमध्ये लिहिले की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर घातक हल्ला, दिल्ली पोलिसांकडून सुरक्षेमध्ये मोठा हलगर्जीपणा. दिल्लीमध्ये मुख्यमंत्रीही सुरक्षित नाहीत. तर दुसऱ्या एखा ट्वीटमध्ये पार्टीने हल्ल्याबाबत प्रेस कॉन्फरन्स घेणार असल्याचे म्हटले आहे. 

दिल्ली सचिवालय में CM @ArvindKejriwal पर हुए हमले के संबंध में Dy CM @msisodia की महत्वपूर्ण प्रेस-वार्ता https://t.co/P2hCdXco8w

— AAP (@AamAadmiParty) November 20, 2018

 आपचा भाजपवर आरोप 

आप आमदार सौरभ भारद्वाज म्हणाले की, केजरीवाल यांच्यावरील हल्ल्याची लिंक भाजपबरोबर आहे. मोदी सरकार गुन्हेगारांना संरक्षण देत आहे. भाजपला आम आदमी पार्टीचे यश पचत नसल्याचे स्पष्ट आहे. त्यासाठीच आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

The attackers are being provided full impunity by the Delhi Police, the police has no intention to take firm action against the attack on the CM : @raghav_chadha pic.twitter.com/x6l8L7dgrR

— AAP (@AamAadmiParty) November 20, 2018
बातम्या आणखी आहेत...