आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'चिमणी पाखरं'मधील नंदिनी-शेखरची थोरली मुलगी आता आहे एका गोंडस मुलीची आई,  या क्षेत्रात आहे अॅक्टिव

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः पद्मिनी कोल्हापुरे आणि सचिन खेडेकर स्टारर 'चिमणी पाखरं' हा चित्रपट नक्कीच तुम्हाला आठवत असेल. 2001 साली प्रदर्शित झालेल्या आणि कौटुंबिक कथानक असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली होती. पद्मिनी कोल्हापुरे आणि सचिन खेडेकर यांच्यासह राजशेखर, बाळ धुरी, अंबर कोठारे, नागेश भोसले, विजय चव्हाण, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया बेर्डे, रमेश देव, तुषार दळवी, रेशम टिपणीस या कलाकारांनी चित्रपटात महत्वाच्या भूमिका बजावल्या होत्या. या कलाकारांसोबत चार बालकलाकार चित्रपटात झळकले होते. भारती चाटे, अविनाश चाटे, मेघना चाटे आणि निहार शेंबेकर ही या बालकलाकारांची नावे आहेत. भारती चाटे हिने चित्रपटात नंदिनी आणि शेखरच्या थोरल्या मुलीची भूमिका वठवली होती. चित्रपट प्रदर्शित होऊन आता जवळजवळ 18 वर्षांचा काळ लोटला आहे. आता भारती चाटे काय करते हे आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून सांगत आहोत. 


'चिमणी पाखरं' हा चित्रपट महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केला होता, तर प्रख्यात 'चाटे कोचिंग क्लासेस'चे मालक मच्छिंद्र चाटे याचे निर्माते होते.  भारती चाटे ही मच्छिंद्र चाटे यांची कन्या आहे. 'चिमणी पाखरं' हा भारतीने अभिनय केलेला तिचा पहिला चित्रपट होता. यानंतर ती चित्रपटात दिसली नाही. पण ती कला क्षेत्रातच अॅक्टिव आहे. 

भारती चाटेने आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने लंडनमध्ये इंटरनॅशनल बिजनेसमधून एमबीए केले आहे. मॅनेजिंग प्रॉडक्शन, चित्रपट दिग्दर्शन, स्टोरी टेलिंग या विषयात तब्बल 9 वर्षांचा तिचा दांडगा अनुभव आहे.

सुरुवातीला तिने माय मराठी या स्टेज शोची धुरा सांभाळली होती. ‘कोठारे व्हिजन’ मध्ये तिने एक वर्ष असिस्टंट डायरेक्टर म्हणूनही काम पाहिले आहे.

भारती आता विवाहित असून एका गोंडस मुलीची आई आहे. आशिष नाटेकर हे तिच्या नव-याचे नाव असून सायशा मुलीचे नाव आहे. 

लग्नानंतर भारतीने 'तू का पाटील' आणि 'मेनका उर्वशी' (२०१९) या चित्रपटांची सहनिर्मिती केली आहे.

भारती आणि आशिष यांनी त्यांच्या मुलीच्या नावावर ‘सायेशा इंटिग्रेटेड कम्युनिकेशन’ नावाने स्वतःची निर्मिती संस्था सुरु केली आहे.