आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन : बाॅलीवूड चित्रपटांची नवी बाजारपेठ, भावनाप्रधान चित्रपट जास्त होतात हिट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गतवर्षी नामांकित चिनी अभिनेत्री चेंग पीपी हिने अापण केवळ ‘दंगल’ हाच एक भारतीय चित्रपट पाहिला असल्याचे सांगून सर्वांनाच अाश्चर्याचा धक्का दिला. हा चित्रपट तिला इतका अावडला की ताे पुन्हा दाखवण्यासाठी ती तिच्या मुलीला घेऊन घेली. चेंगने ‘भास्कर’ शी बाेलताना सांगितले की, हा एक सकारात्मक चित्रपट अाहे. तसेच यात नाट्यही अाहे. चेंग ही अशा चिनी प्रेक्षकांपैकी अाहे, जे अाता बाॅलीवूडचे सिनेमे माेठ्या अावडीने पाहतात. या महिनाअखेरपर्यंत ‘सुलतान’ दिगदर्शित हाेणार अाहे. ‘दंगल’ चित्रपटामुळे चीनमध्ये भारतीय चित्रपटांना अाेळख मिळाल्याचे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंटचे सीईअाे सुशीलकुमार अग्रवाल यांनी सांगितले. 

 
चित्रपट वितरक अक्षय राठी सांगतात की, चीनमध्ये ‘बाहुबली’ सारखा चित्रपट चालला नाही; परंतु ‘दंगल’ व ‘सिक्रेट सुपरस्टार’ ने चांगला व्यवसाय केला. ‘दंगल’ मध्ये अामिर खानने वडिलांची जशी भूमिका साकारली अाहे, तसे कठाेर वडील चीनमध्ये असतात, हे यामागील कारण हे अाहे. चिनी प्रेक्षकांना तरुणी-महिलांचे मुद्दे खूप अावडतात. याच कारणामुळे ‘सिक्रेट सुपरस्टार’ ही तेथे यशस्वी ठरला. विशेष म्हणजे, अामिर खान यास याेगायाेग म्हणताे. ‘भास्कर’ ला दिलेल्या एका मुलाखतीत अामिर खान म्हणाला हाेता की, मी माझ्या अनुभवावरून हे सांगू शकताे की, भारतीय व चिनी एकसमान भावनिक मुद्द्यांना शेअर करतात. अाम्हाला एकसारख्या भावनिक वस्तू अावडतात. तसेच अामची काैटुंबिक मूल्येही सारखीच अाहेत.  


इराेस प्राॅडक्शनच्या अमिता नायडूंनी सांगितले की, सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’ नेही चीनमध्ये चांगला गल्ला जमवला हाेता. या चित्रपटाने चिनी प्रेक्षकांच्या हृदयाला हात घातला हाेता, हे याचे कारण अाहे. चिनी प्रेक्षक मारधाडपटांसाठी हाॅलीवूड व स्थानिक चित्रपटांना प्राधान्य देतात, तर भारतीय चित्रपटांतून त्यांना ह्यूमन ड्रामा व चांगले संगीत हवे असते. ‘हिंदी मीडियम’ चे निर्माते भूषणकुमार सांगतात की, मी एप्रिलमध्ये चीनला गेलाे हाेताे. तेथे हा चित्रपट पाहून चिनी प्रेक्षकांना हसताना, रडताना व पात्रांशी एकरूप हाेताना पाहिले. ही माझ्यासाठी माेठी शिकवण अाहे. भारतीय चित्रपटांची चीनमध्ये ही केवळ सुरुवात अाहे. अाम्ही यापुढेही असे करू शकताे. तथापि, अाम्ही चिनी बाजारपेठेवर कब्जा मिळवला अाहे असे नाही. केवळ अामिर खानलाच तेथे सातत्याने यश मिळाले अाहे. चीनमध्ये विदेशी चित्रपट रिलीज करण्याबाबतही खूप कठाेर धाेरण अाहे. अाम्हाला त्यांच्याकडून चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी परवानगी घ्यावी लागते. ते असेच चित्रपट मंजूर करतात, जे त्यांच्या देशात सूट हाेतात, असे व्यवसायतज्ज्ञ अामाेद मेहरा यांनी सांगितले. काेमल नाहाटा सांगतात की, स्टुडिअाेज व प्राॅडक्शन हाऊस हे चिनी प्रेक्षकांना अावडणारे चित्रपट तयार करण्याचा प्रयत्न करत अाहेत. दिग्दर्शक कबीर खान (जू कीपर) व सिद्धार्थ अानंद (लव्ह इन बीजिंग) हेदेखील इंडाे-चायनीज प्राॅडक्शनच्या अंतर्गत चित्रपट दिग्दर्शित करत अाहेत.   


चीनमध्ये ४४,००० स्क्रीन्स, तर अामच्याकडे सुमारे १२ हजार  : अल्ट्रा ग्रुपचे सुशीलकुमार यांनी सांगितले की, चीनमध्ये भारतीय चित्रपटांना यश मिळण्यामागे तेथे असलेली स्क्रीन्सची जास्त संख्या, हे कारण अाहे. तेथे सुमारे ४४,००० स्क्रीन्स अाहेत, तर अापल्याकडे सुमारे १० ते १२ हजार. जास्त लाेकसंख्या व स्क्रीन्स असल्यामुळे नागरिकांना सतत चांगले विषय हवे असतात. व्यवसायतज्ज्ञ नरेंद्र गुप्ता सांगतात की, अामिरचा एक चित्रपट भारतात ४,५०० व चीनमध्ये ९,००० स्क्रीन्सवर प्रदर्शित हाेताे. त्यामुळे फरक तर पडताेच.

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, कोणत्‍या चित्रपटांनी केला सर्वाधिक व्‍यवसाय...

 

बातम्या आणखी आहेत...