आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

130 अनाथ मुले पायलट व्हावीत यासाठी एअरलाइन देत आहे प्रशिक्षण; स्वतःच उचलत आहे मुलांचा खर्च

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चीनची लिली एअरलाइन 130 अनाथ मुलांना पायलटचे प्रशिक्षण देत आहे. हवाई प्रवास करताना येणाऱ्या अडचणींना कशाप्रकारे दूर करता येईल याबाबत त्यांना ट्रेनिंगमध्ये सांगण्यात येत आहे. अनाथ मुलांना आपले भविष्य सुधारता यावे यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याचा आमचा उद्देश असल्याचे लिली एअरलाइनकडून सांगण्यात आले आहे. 

 

निंबध स्पर्धेतून करण्यात आली मुलांची निवड

कोर्स इंस्ट्रक्टर चांग ही यांनी सांगितले की, 'एअरलाइनने या प्रशिक्षणासाठी एक निबंध स्पर्धा ठेवली होती. तुम्हाला पायलट का व्हायचे? असे या स्पर्धेचे नाव ठेवण्यात आले होते. या स्पर्धेतून लिओनिंग या अनाथ शाळेतून 130 मुलांची निवड करण्यात आली. त्यांना आता विमानाची तांत्रिक माहिती देण्यात येत आहे. चीनच्या नागरी व्यवहार मंत्रायलाच्या आकडेवारीनुसार देशभरातील अनाथ मुलांची संख्या एकूण 3 लाख 43 हजार आहे. गेल्या 3 वर्षांच्या तुलनेत 30% कमी झाला आहे.'

बातम्या आणखी आहेत...