आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • China Approves Community Reform Law; Prisoners Of Lesser Punishment Will Benefit

चीनमध्ये सामुदायिक सुधारणा कायद्यास मंजुरी; कमी शिक्षेच्या कैद्यांना मिळणार लाभ

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • 1 जूनपासून कायदा लागू, लाेकांनाही मिळणार मूलभूत आराेग्य सुविधा
  • हेल्थ केअर व मेडिकल उद्याेगास लाेकांचे कल्याण लक्षात घेऊन धाेरण बनवण्याची सूचना

​​​​​​बीजिंग : चीनच्या सरकारने गुन्हेगारी प्रवृत्तीला मुख्य प्रवाहात आणणाऱ्या कायद्यास मंजुरी दिली आहे. देशात अशा प्रकारचा हा पहिलाच कायदा आहे. कमी शिक्षा झालेल्या गुन्हेगारांचे कायदेशीर पुनर्वसन करण्याची ही प्रक्रिया आहे. त्याशिवाय आराेग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. भविष्यात चांगले जीवन देण्यासाठी सरकारच्या पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. चीनच्या सर्वाेच्च नागरी सभागृह नॅशनल पीपल्स काँग्रेसने शनिवारी सामुदायिक सुधारणांसाठी देशात पहिल्यांदाच अशा कायद्याला मंजुरीही दिली.

या कायद्याच्या अंमलबजावणीची व संरक्षणाची जबाबदारी न्यायिक प्रशासन विभागाकडे साेपवण्यात आली आहे. कायद्यात स्पष्टपणे मेडिकल तसेच आराेग्य सुविधा संबंधी उद्याेग सामान्य जनतेचा विचार करून काम करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला पायाभूत आराेग्य सुविधा मिळाव्या यासाठी चीनमध्ये तयार करण्यात आलेला हा पहिलाच कायदा आहे. त्याची अंमलबजावणी १ जून २०२० पासून हाेणार आहे. काँग्रेसच्या दर दाेन महिन्यांनी सहा दिवसांसाठी हाेणाऱ्या अधिवेशन काळात सुरक्षा कायदा व वन कायद्यातील दुरुस्तीस मंजुरी मिळाली आहे. ही देशातील १३ वी नॅशन पीपल्स काँग्रेस ठरेल. इतर काही मुद्यांवर संसदेची तिसरी बैठक ५ मार्च २०२० मध्ये बीजिंगला हाेईल.

कायद्याच्या दुरुस्तीनंतर या गुन्हेगारांना लाभ मिळण्याची शक्यता

नवीन कायद्यानुसार साैम्य स्वरूपाची शिक्षा झालेल्या किंवा पॅराेलवरील, तुरुंगाबाहेर निगराणीखाली ठेवलेले किंवा तुरुंगाबाहेर राहून शिक्षा पूर्ण करणाऱ्या गुन्हेगारांना नवीन दुरुस्ती कायद्याचा फायदा मिळणार आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीजी जबाबदारी न्यायिक प्रशासनाकडे साेपवण्यात आली आहे. त्या अंतर्गत न्यायालय, सरकारी वकील, सार्वजनिक सुरक्षा विभागाचा संबंधही येताे.
 

बातम्या आणखी आहेत...