Home | International | China | china-backing-pakistan

चीनचा अमेरिकेला अप्रत्यक्षपणे इशारा

वृत्तसंस्था | Update - May 20, 2011, 03:25 PM IST

पाकिस्तानवर हल्ला केल्यास चीनवरच हल्ला झाला असे मानले जाईल...

  • china-backing-pakistan

    इस्लामाबाद - पाकिस्तानवर हल्ला केल्यास चीनवरच हल्ला झाला असे मानले जाईल, असा इशारा चीनने दिला आहे.लादेनवरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर चीनने हा अप्रत्यक्षपणे अमेरिकेलाच इशारा दिला आहे. अमेरिकेने पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचा सन्मान करावा असेही चीनने म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रजा गिलानी सध्या चीनच्या दौऱयावर आहेत.

    चीनचे पंतप्रधान वेन जियाबाओ आणि गिलानी यांच्यात विविध मुद्यांवर चर्चा झाली. जिआबाओ यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पत्रकार परिषदेत गिलानी म्हणाले,'तैवान आणि तिबेटच्या मुद्यांवर चीनच्या भूमिकेचे पाकने नेहमीच समर्थन केले आहे. दहशतवादाच्या विरोधातील लढाईतील पाकने दिलेले योगदान चीनने मान्य केले आहे. त्यामुळे आता पाक लष्कराची क्षमता वाढवून त्याला अत्याधुनिक बनविण्यासाठी चीन पाकला सर्वतोपरी मदत करणार आहे. गिलानी - जिआबाओ यांच्यात झालेल्या समझोत्यानुसार चीन पाकला ५ अत्याधुनिक लढाऊ विमाने देणार आहे. या शिवाय चीन व पाकचे संरक्षण तज्ज्ञ लढाऊ विमाने विकसित करत असून जूनमध्ये त्याचे उत्पादन सुरु होईल.

Trending