आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • China Builds Nuclear Reactor Based On Sun Energy, Ready To Build Never ending Fuel

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनने सूर्य ऊर्जेवर आधारित परमाणु रिअॅक्टर बनवले, कधीच न संपणारे इंधन बनवण्याच्या तयारीत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीनने सिचुआन प्रांतात परमाणु फ्यूजन रिअॅक्टर बसवले आहे, याला जीवाश्म इंधनाला पर्याय म्हणून तयार केले जात आहे
  • फ्रांसमध्ये 1.4 लाख कोटी रु. खर्च करून जगातील सर्वात मोठा फ्यूजन रिअॅक्टर तयार केला जात आहे
  • सुर्याच्या ऊर्जेचा स्रोताने यात परमाणु फ्यूजन होते, ज्यात हायड्रोजनचे दोन परमाणु मिळून हिलीयम तयार करतात

बिजींग- चीनने सुर्याच्या ऊर्जेच्या मदतीने परमाणु फ्यूजन रिअॅक्टर तयार केले आहे. रिअॅक्टर एचएल-2एमला सिचुआन प्रांताची राजधानी चेंगदुमध्ये बनवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार रिअॅक्टर 2020 मध्ये काम करणे सुरू करेल. यातून चीन जीवाश्म इंधन म्हणजेच पेट्रोल-कोळसा-डीझेलला पर्याय उपलब्ध करून देईल. सुर्यात परमाणु संलयन(न्यूक्लियर फ्यूजन) होत असतो. या प्रक्रियेत हायड्रोजनचे दोन परमाणू मिळून हिलीयम तयार करतात. संलयन आधारित रिअॅक्टर बनवून चीन जगाला संदेश देऊ इच्छित आहे की, प्रदूषणरहित ऊर्जेचा सप्लाय कधीच बंद होणार नाही.महाग तंत्रज्ञान
 
फ्यूजन आधारित तंत्रज्ञानावर रिअॅक्टर बनवने खूप महाग आहे. अनेक शास्त्रज्ञ अशा प्रक्रियेतून इंधन बनवण्यास विरोध करतात. बिजींगच्या सिंघुआ यूनिव्हर्सिटीमधील प्राध्यापक गाओ झे यांनी सांगितले की, "समस्येचे उत्तर मिळेल, याची कोणतीच हमी नाहीये. पण आपण काहीच केले नाही, तर समस्या कधीच संपणार नाहीत."

फ्रांसमध्ये सुरू आहे जगातील सर्वात महाग प्रोजेक्ट
 
चीन इंटरनॅशनल थर्मोन्यूक्लियर एक्सपेरिमेंटल रिएक्टर(आयटीईआर) प्रोजेक्टचे सदस्य आहे. यात भारत, अमेरिका, जापान, दक्षिण कोरिया आणि रशिया सदस्य आहेत. सध्या आयटीईआरचा मुख्य उद्देश फ्रांसमधील जगातील सर्वात महाग प्रोजेक्ट आहे. यात 15.5 बिलियन पाउंड (1.4 लाख कोटी रुपये)चे फ्यूजन रिअॅक्टर बनवले जात आहे. यात सध्या कमी प्रमाणात विज निर्मिती केली जात आहे. 2025 पर्यंत या रिअॅक्टरचे काम पूर्ण होईल. 1960 च्या दशकात सोवियत संघ (आता रशिया)ने टोकामेक नावाचे फ्जूजन रिअॅक्टर बनवण्याचा प्रयत्न केला होता.
 

बातम्या आणखी आहेत...