आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्दळीच्या ठिकाणी गुडघ्यावर रांगताना दिसले लोक, सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडिओ; पोलिसांनीही घेतली याची दखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बीजिंग : चीनची एक कंपनी कर्मचाऱ्यांप्रतिच्या आपल्या वागणुकीमुळे चर्चेत आहे. वार्षिक टार्गेट पूर्ण न केल्यामुळे या कंपनीने कर्मचाऱ्यांना विचित्र शिक्षा दिली आहे. या शिक्षेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना या घटनेची दखल घ्यावी लागली. सदर घटनेनंतर कंपनी बंद असल्याचे सांगितले जात आहे. 


कर्मचाऱ्यांना दिली विचित्र शिक्षा

> कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला शिक्षेचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये कर्मचारी वर्दळ असलेल्या रस्त्यावर गुडघ्यावर रांगताना दिसत आहेत. तर एक व्यक्ती हातात झेंडा घेऊन त्यांच्यासोबत चालताना दिसत आहे. तर रस्त्याच्या कडेने पायी जाणारे लोक हा सर्व प्रकार पाहून हैराण झालेले दिसत आहेत. यातीलच एकाने या घटनेचा व्हिडिओ तयार करून शेअर केला आहे.  

 

> हा व्हिडिओ ऑनलाइन शेअर झाल्यानंतर व्हायरल झाला. अनेक युझर्सनी या घटनेमुळे कंपनीला टोचून बोलताना म्हणाले की, या कंपनीने त्यांच्या कामगारांची प्रतिष्ठा कमी केली आहे. त्यामुळे ही कंपनी बंद पडणार आहे. तर काही लोकांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शिक्षा भोगणाऱ्या कर्मचाऱ्यांवर टिका केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, अशी वागणूक सहन करता कामा नये. फक्त पैशांसाठी कोणी आपली प्रतिष्ठा अशी पणाला कशी लावू शकतात. 

 

> व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे ही बाब पोलिसांपर्यंत पोहोजली आणि त्यांनीही या घटनेची दखल घेतली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या घटनेनंतर कंपनी बंद असल्याचे सांगितले जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...