आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये काेराेना व्हायरसचे भीषण संकट, मृतांची संख्या गेली 41 वर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग : चीनमध्ये काेराेना विषाणू संसर्गामुळे मृतांची संख्या शनिवारी ४१ वर पाेहाेचली आहे. संसर्ग झालेल्यांची संख्या १३०० झाली आहे. काेराेनाचे सावट यंदाच्या चिनी नूतन वर्षाच्या कार्यक्रमावर दिसले

विषाणूच्या संक्रमणाचा आकडा एक हजाराहून जास्त हाेण्याची ही पहिलीच वेळ आहे. २३७ लाेकांची प्रकृती गंभीर बनली आहे, अशी माहिती चीनच्या राष्ट्रीय आराेग्य आयाेगाने शनिवारी दिली. बीजिंगसह सर्वच प्रांतांतील संक्रमित रुग्णांची संख्या वाढल्याचे सांगण्यात येते. त्यातून आतापर्यंत ४१ जणांचा मृत्यू झाला. हुबेई प्रांतात ३९ जण मृत्युमुखी पडले आहेत. हेलाँगजियांग प्रांतात एकाचा मृत्यू झाला, असे आयाेगाने स्पष्ट केले. बाधितांची संख्या वाढत असल्याने चीनने शनिवारी १३०० खाटांचे आणखी एक रुग्णालय बांधण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. वुहानमध्ये पंधरा दिवसांत ते उभे राहील. शहरात दहा दिवसांत एक रुग्णालय उभारले आहे. विषाणू हाँगकाँग, मकाऊ, तैवान, नेपाळ, जपान, सिंगापूर, दक्षिण काेरिया, थायलंड, व्हिएतनाम व अमेरिका या देशांतही पसरला आहे. जपानमध्ये आणखी एकाला बाधा झाल्याचे सांगण्यात आले हाेते.

चिनी डाॅक्टरचा मृत्यू

वुहानमधील संसर्गाची दहशत आता वाढली आहे. ही भीती आराेग्य कर्मचाऱ्यांतही दिसून येत आहे. शनिवारी एका चिनी डाॅक्टरचा काेराेनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. लियांग पुडाँग (६२) असे डाॅक्टरचे नाव आहे. १६ जानेवारी राेजी त्यांना संसर्ग झाल्याची लक्षणे दिसून आली हाेती. दाेन दिवसांनंतर त्यांना हुबेईतील रुग्णालयात पाठवण्यात आले. परंतु शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. वुहान पालिकेतील १५ वैद्यकीय कर्मचाऱ्यांना बाधा झाल्याचा दावा मान्य केला हाेता.
 

बातम्या आणखी आहेत...