आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बीजिंग - चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे मृतांचा आकडा 638 वर पोहोचला आहे. या व्हायरसमुळे एका दिवसात 73 लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान कोरोना व्हायरसचा सर्वप्रथम धोका सांगणारे डॉक्टर वेनलियांग यांचा देखील शुक्रवारी मृत्यू झाला. ते स्वतः या व्हायरसने पीडित होते. डॉक्टरांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर रोष व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांचा माफी मागावी अशी मागणी जोर धरत आहे.
पोलिसांनी डॉक्टरांना हा दावा मागे घेण्यास भाग पाडले होते
डॉक्टरांनी 30 डिसेंबर रोजी वैद्यकीय शाळेत आपल्या सहकाऱ्यांना हा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरणार असल्याचे सांगितले होते. त्यांनी कोरोनाला सार्स(2002) व्हायरसप्रमाणे असल्याचा दावा केला होता. त्यानंतर जानेवारीच्या सुरूवातीला पोलिसांनी डॉक्टर ली यांची चौकशी सुरू केली आणि आपला हा दावा खोटा असल्याचे सांगण्यास भाग पाडले होते. हे दावे बेकायदेशीर अफवा असल्याचे सांगणार्या निवेदनावरही त्यांच्याकडून सही करून घेतली होती.
चिनी कंपनीचा खुलासा - व्हायरसमुळे 25 हजार जणांचा मृत्यू
याशिवाय या व्हायरसच्या संसर्गाचा आकडा 31 हजारांपर्यंत पोहोचला आहे. मात्र, गुरुवारी चीनी अधिकृत तंत्रज्ञान कंपनी टेंसेंटने या अधिकृत आकडेवारीवरून एक डेटा लीक झाल्याची माहिती दिली. या आकडेवारीनुसार चीनमध्ये कोरोनामुळे 25 हजार लोक दगावले आहेत. तर 1.54 लाख लोकांना या विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.