आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनचा सायकल महामार्ग: ६.५ कि.मी लांबीच्या तीन मार्गिका रस्त्यावर सायकलच चालणार, ११ हजार लाेक करतात प्रवास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चीनची राजधानी बिजिंगमध्ये देशातील पहिला सायकल महामार्ग सुरू झाला आहे. तीन मार्गिका असलेल्या या महामार्गाची लांबी ६.५ कि.मी असून ६ चाैरस फूट  रुंद आहे. हुइलाेंगुआन आणि शांगदी या भागांना हा महामार्ग जाेडताे. या भागातून जवळपास ११,६०० लाेक राेज प्रवास करतात. व्यस्तवेळेतही या भागात माेठी वाहतूक काेंडी हाेते. लाेकांचा त्रास कमी व्हावा म्हणून हा महामार्ग तयार केला आहे.  या तीन  मार्गिकांवरून फक्त सायकल चालविण्यात येतील. त्यासाठी प्रती तास १५ कि.मी वेग निश्चित केला आहे.  महामार्गावर जाण्यासाठी ८ प्रवेशद्वार आहेत. विशेष म्हणजे ४,५०० सायकल पार्क करण्याची व्यवस्था आहे. ट्रॅफिक सिग्नल आणि साईनबाेर्ड येथे आहेत.

बातम्या आणखी आहेत...