आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलीबाबाला भारतात वाटते भीती, व्यवसाय स्पर्धेत उतरण्याची कंपनीची तुर्तास इच्छा नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शांघाय - चीनजी सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अलीबाबाने अलीकडेच सांगितले की, तिला भारतामध्ये फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनसारख्या कंपन्यांसोबत स्पर्धा करण्याची इच्छा नाही. त्यांनी सांगितले की भारताचे ऑनलाइन मार्केट सध्या विखुरलेले आहे आणि त्याला परिपक्व होण्यास कालावधी लागणार आहे. रविवारी अलीबाबा ग्रुपचे कार्यकारी सहसंस्थापक जोसेफ सी साई यांनी सांगितले की, भारत हे एक असे मार्केट आहे जेथे आम्हाला काळजीपूर्वक उतरले पाहिजे. त्यांनी पुढे म्हटले की भारतीय बाजाराला विस्तारण्यास थोडा अवधी लागणार आहे.

 

अलीकडेच अलिबाबा ग्रुप होल्डिंग लिमिटेड (Alibaba Group Holding ltd)ने रविवारच्या सिंगल्स डे सेलमध्ये 30.70 अब्ज डॉलर्सची म्हणजेच 2.20 लाख कोटी रूपयांची कमाई केली आहे. 24-तासांच्या या सेलमध्ये जगभरातील लोक भरपूर खरेदी करतात. इव्हेंटच्या वार्षिक वाढीचा दर आतापर्यंत सर्वात कमी नोंदवला गेला आहे. सेलच्या पहिल्या तासात लोकांनी 10 अब्ज डॉलर्स (72 हजार कोटी रूपये)  खरेदी केली होती. कंपनीने सिंगल्स डे सेलमध्ये फक्त 82 सेकंदात 1 अब्ज डॉलर्सची कमाई केली होती.

 

दरवर्षी करण्यात येते या सेलचे आयोजन
चीनमध्ये दरवर्षी नोव्हेंबर 11 रोजी सिंगल्स डे साजरा केला जातो. या दिवशी चीनी ई-कॉमर्स कंपनी अलिबाबा ग्रुप सिंगल्स डे सेल आयोजित करते. चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती जॅक मा (Jack Ma) यांची अलिबाबा कंपनी जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी आहे आणि सिंगल्स डे हा जगातील सर्वात मोठा ऑनलाइन सेल कार्यक्रम आहे. अमेरिकन शॉपिंग हॉलिडे, ब्लॅक फ्रायडे आणि सायबर मंडे (Cyber Monday)यांच्या एकत्रित कमाईपेक्षा सिंगल्स डे सेलच्या कार्यक्रमात अधिक कमाई होते.


भारताचे ई-कॉमर्स मार्केट सध्या 20 अब्ज डॉलरच्या पर्यंत पोहोचला आहे
अलीबाबाचे सहसंस्थापक जोसेफ साई यांनी सांगितले की, भारताचे ई-कॉमर्स मार्केट सध्या 20 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे आणि याबाबतीत भारत चीनच्या तुलनेने खूप पिछाडीवर आहे. यासह त्यांनी सांगितले की, भारताच्या वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे नियम आहेत. या व्यतिरिक्त, अलीबाबा भारतातील पेमेंट व्यवसायावर देखील लक्ष केंद्रित करेल. अलीबाबा ग्रुपचे सीईओ डॅनियल जॅंग म्हणाले की, जर भारतीय बाजारपेठेत प्रवेश करायचा असेल तर आम्ही पेमेंटला किती महत्व देत आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे. साईने असेही म्हटले की पेमेंट व्यवसायात भागीदारी केल्याने आम्हाला बाजारापेठ जाणून घेण्यास मदत झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...