आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानई दिल्ली- चीन भलेही आतंरराष्ट्रीय स्तारावर भारताला आपला प्रतिस्पर्धी मानतो आणि अंतरराष्ट्रीय स्तारावर भारताच्या हितासाठी असलेल्या निर्णयांमध्ये अडथळा आणतोय. पण त्याच चीनचा लाखोंचा व्यवसाय भारतावर अवलंबुन आहे. चीन दरवर्षी भारतात 5 लाख कोटींचे आयटम्स एक्सपोर्ट करतो. आम्ही तुम्हाला अशा पाच टॉप आयटम्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांना भारतात विकून चीन मोठी कमाई करत आहे.
1. इलेक्ट्रिकल मशीनरी आणि इक्विपमेंट
चीन इलेक्ट्रिकल मशीनरी आणि इक्विपमेंट तसेच त्यासंबधीचे पार्ट्स, साउंड रेकॉर्डर आणि रिप्रोड्यूसर्स, टेलीव्हीजन इमेज अँड साउंड रिकॉर्डर्स आणि प्रोड्यूसर्सच्या निर्यातीवरून सगळ्यात जास्ती कमाई करतो. चीनने आर्थिक वर्ष 2018-19 च्या एप्रिल-डिसेंबरमध्ये भारताला 1.12 लाख कोटी रूपयांची इलेक्ट्रिकल मशीनरी आणि इक्विपमेंट एक्सपोर्ट केले आहेत.
2. न्यूक्लियर रिएक्टर्स, मशीनरी आणि मॅकेनिकल अप्लायंसेस
चीन, भारतला न्यूक्लियर रिएक्टर्स, मशीनरी आणि मॅकेनिकल अप्लायंसेसच्या एक्सपोर्टनेही मोठी कमाई करतात. चीनने एप्रिल-डिसेंबर, 2018-19 च्या दरम्यान भारताला 70 हजार कोटींचे इक्व्यूपमेंट विकले.
3. ऑर्गेनिक केमिकल्स
या लीस्टमध्ये ऑर्गेनिक केमिकल्स तिसऱ्या नंबरवर आहे. चीनने आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये एप्रिल-डिसेंबरच्या दरम्यान ऑर्गेनिक केमिकल्स विकून 46 हजार कोटींचा व्यवहार केला आहे.
4.प्लास्टिक आयटम्स
चीनने प्लास्टिक आयटम्स विकून भारतातून चांगली कमाई केली. आर्थिक वर्ष 2018-19 च्या एप्रिल-डिसेंबरच्या दरम्यान चीनने अंदाजे 14 हजार कोटींची कमाई केली आहे.
5.फर्टिलाइझर्स
चीनने एप्रिल-डिसेंब 2018-19 च्या दरम्यान 11,252 कोटी रूपयांचे फर्टिलाइझर्स भारतात एक्सपोर्ट केले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.