आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • China Moon Mission Lands Chang\'e 4 Spacecraft On Far Side

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चंद्राच्या डार्क साइडवर यशस्वीरित्या उतरवले चीनचे चांग-ई-4 अंतराळयान; Photo सुद्धा पाठवले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चंद्राच्या डार्क साइडला उतरणारा चीन जगातील पहिला देश बनला आहे. चीनचे चांग-ई-4 अंतराळयान गुरुवारी रात्री यशस्वीरित्या उतरले आहे. चीनच्या स्थानिक वेळेनुसार, सकाळी 10 वाजून 26 मिनिटाला हे यान चंद्रावर उतरले आहे अशी माहिती चीनच्या सरकारी माध्यमांनी जारी केली. या अंतराळयानमध्ये चंद्राच्या त्या भागाला असलेल्या खगोलीय बाबींचा अभ्यास करणारी अत्याधुनिक उपकरणे आहेत. त्या ठिकाणी याच उपकरणांच्या माध्यमातून बायोलॉजिकल प्रयोग सुद्धा केले जाणार आहेत.

 

अंतराळ संशोधनात मैलाचा दगड

चीनने केलेली ही लॅन्डिंग जागतिक अंतराळ संशोधन क्षेत्रातील मैलाचा दगड ठरला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चंद्राच्या पलिकडच्या बाजूवर अंतराळयान उतरवण्याचे आणि तेथील परिसराचे अभ्यास करण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतु, अद्याप एकही अंतराळयान त्या बाजूला यशस्वीरित्या उतरलेला नव्हता. चंद्रावर उतरण्याची शेवटची मानवी मोहिम अॅपोलो-17 1972 मध्ये पार पडली. चांग-ई-4 स्पेसक्राफ्टने चंद्राच्या त्या बाजूला उतरल्यानंतर पहिले फोटो सुद्धा पृथ्वीवर पाठवले आहेत. चीनच्या सरकारी माध्यमांनी ते जारी केले आहेत.

 

#BREAKING: China’s Chang’e-4 probe successfully made the first-ever soft landing on the far side of the Moon on the South Pole-Aitken basin Thursday morning, a major milestone in space exploration. #ChangE4 pic.twitter.com/mt2YTWqlxs

— Global Times (@globaltimesnews) January 3, 2019