आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदीत 6 फूट व्यासाचा बर्फाचा गोलाकार तुकडा एकाच जागी फिरताना दिसला   

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिजींग - चीनच्या अंतर्गत मंगोलिया स्वायत्त प्रदेशातील गेन्हे नदीत बर्फाचा गोलाकार गोलाकार तुकडा चर्चेत आला आहे. नैसर्गिकरित्या तयार झालेल्या या तुकड्याचे अशाप्रकारे फिरणे दुर्लभ मानले जात आहे. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, हवामान शास्त्रज्ञांनी 3 नोव्हेंबर रोजी हा फिरणारा तुकडा कॅमेरात टिपला होता. बर्फाच्या या गोलाकार तुकड्याचा व्यास 6 फूट आहे आणि तो घडाळ्याचा उलट दिशेने फिरत आहे. गेन्हे नदीचे तापमान -5.3 डिग्री सेल्सिअस राहते. ही नदी वर्षातील 200 हून अधिक दिवस गोठलेली असते. असे का होते ?

नदी किनारी जेथे बर्फाचे डिस्क तयार होतात, तेथे वेगाने वाहणारे पाणी प्रतिगामी बल निर्माण करते. हे बल त्या बर्फाला तोडते आणि उलट दिशेने फिरवते. येथे हे बल घडाळ्याच्या उलट दिशेने पाहायला मिळाले. 

अमेरिकेत नदीत उतरला होता चंद्र

यावर्षी जानेवारीत अमेरिकेतील वेस्टब्रूक शहरातील प्रेसंपकॉट नदीत गोलाकार बर्फ जमा झाला होता. नदीत चंद्र उतरल्यासारखा वाटत होते. नदीजवळील राहणाऱ्या रॉब मिशेलने सांगितले होते की, बदके त्या बर्फाच्या गोळ्यावरून चालत गेले होते. यामुळे त्यांच्या पायांच्या ठशांमुळे या बर्फाच्य गोळ्यावर चंद्रासारखे दाग दिसू लागले होते. बातम्या आणखी आहेत...