आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये तरुणीच्या हत्येच्या खोट्या गुन्ह्याखाली 25 वर्षे जेल; 4.7 कोटी भरपाई

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- चीनमध्ये लियू झोंगलिन (५०) हा तरुणीच्या हत्येच्या आरोपाखाली २५ वर्षे तुरुंगात हाेता. लियूवर लागलेले आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्यास ४.७ कोटींची नुकसान भरपाई देण्यात आली. लियूने सांगितले, आयुष्याची इतकी वर्षे गेली त्याचे काय? 

 

हे प्रकरण १९९० मधील आहे. जिलिन प्रांतात हुइली गावात १८ वर्षांच्या एका तरुणीची हत्या झाली होती. तेव्हा लियूला दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली. तेव्हा लियूचे वय २२ वर्षे होते. त्यानंतर काही काळानंतर त्याला जन्मठेप झाली. लियू गेल्या १७ वर्षांपासून या प्रकरणी अपील करत होता. २८ मार्च २०१२ रोजी हायकोर्टाने या प्रकरणाची समीक्षा करण्याचा निर्णय घेतला. सहा वर्षांहून अधिक काळ समीक्षा केल्यानंतर लियूला निर्दोष ठरवले. 

बातम्या आणखी आहेत...