आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शी जिनपिंग यांचे चेन्नई विमानतळावर भव्य स्वागत; मोदींसोबत 40 मिनिटांची बैठक करणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या दुसऱ्या अनौपचारिक बैठकीसाठी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग शुक्रवारी दुपारी 2 वाजता चेन्नईत दाखल झाले. येथील विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. मोदी आणि जिनपिंग यांच्या भेटीचा हा कार्यक्रम 6 तास चालणार आहे. यादरम्यान भारताचे पंतप्रधान आणि चीनचे राष्ट्रपती यांच्यात 40 मिनिटांची बैठक होणार आहे. 

भारत-चीनचे संबंध मजबूत होईल - मोदी
जिनपिंग यांच्या भेटीसाठी मोदी अगोदरपासून चेन्नईत दाखल झालेले आहेत. या भेटीमुळे भारत आणि चीनमधली संबंध मजबूत होणार असल्याचे मोदींनी सांगितले. तमिळनाडूच्या महाबलीपुरम येथे शुक्रवार आणि शनिवार दोन दिवस मोदी आणि जिनपिंग यांची भेट होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महाबलीपुरममध्ये 5 हजार सैनिक तैनात करण्यात आले आहेत. शहरातील रस्ते आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी 800 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. यासह भारतीय नौसेना आणि तटरक्षक दलाने समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर युद्धपोत तैनात केले आहेत. 
 

दहशतवाद, टेरर फंडिगवर चर्चा होण्याची शक्यता 
जिनपिंग यांच्यासह चीनचे परराष्ट्र मंत्री आणि पोलित ब्युरोचे सदस्य भारतात येत आहेत. या बैठकीसाठी कोमताही अजेंडा निश्चित करण्यात आलेला नाही. मात्र भारत-प्रशांत क्षेत्र, सीमा विवाद, दहशतवाद, व्यवसायातील असंतुलन, टेरर फंडिंग इत्यादी मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. यादरम्यान कोणताही करार किंवा एमओयूवर स्वाक्षऱ्या करण्यात येणार नाहीत. परंतू मोदी-जिनपिंग यांच्याकडून संयुक्त निवेदन जारी केले जाऊ शकते. मोदी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पहिल्या अनौपचारिक बैठकीसाठी चीनच्या वुहान येथे गेले होते. 
 

बातम्या आणखी आहेत...