आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनने तयार केला स्मार्ट युनिफॉर्म; विद्यार्थ्यांच्या हालचालींवर ठेवणार बारीक लक्ष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेइजिंग- विद्यार्थ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी चीनने चक्क चिप असणारा स्मार्ट युनिफॉर्म तयार केला आहे. 1500 रुपये किंमत असलेल्या या युनिफॉर्मच्या खांद्याच्या भागावर एक विशिष्ट प्रकारची चिप बसवण्यात आली आहे. या चिपमुळे विद्यार्थ्यांच्या सर्व हालचाली शाळेच्या गेटवर बसवलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टिममध्ये रेकॉर्ड होणार आहे.

 

चीनने तयार केली जगातील सर्वात मोठी लक्ष ठेवणारी सिस्टिम
> चीनने याआधीही अशाप्रकारची सिस्टिम तयार केली होती. त्याअंतर्गत स्काय नेट नावाच्या प्रोजेक्टमध्ये 2 कोटी कॅमेरे बसवण्यात आले होते. या प्रोजेक्टच्या माध्यमातून फक्त 3 सेकंदात 1.4 अब्ज लोकांना आयडेंटीफाय करणे शक्य होते.
> चीनच्या या स्मार्ट युनिफॉर्मला गुइझोउ गुआनयू टेक्नोलॉजीने तयार केले आहे. या स्मार्ट युनिफॉर्ममुळे विद्यार्थ्यांच्या जाण्या-येण्याच्या वेळ स्मार्ट एंट्रान्स सिस्टिममध्ये रेकॉर्ड होणार आहे.
> एंट्रान्स सिस्टिममध्ये बसवलेला कॅमेरा शाळेत विद्यार्थ्यांच्या एंट्री आणि एग्झिटचा 20 सेकांदाचा व्हिडिओ रेकॉर्ड करेल. त्यानंतर तो व्हिडिओ शिक्षक आणि पालकांसाठी तयार केलेल्या अॅप्लीकेशनमध्ये अपलोड केला जाईल. जर एखादा विद्यार्थी परवानगीशिवाय शाळेतून बाहेर गेल्यास तातडीने अलार्म वाजू लागेल.
    
स्मार्ट युनिफॉर्म तयार करण्यासाठी लागले दोन वर्षे
गुआनयू टेक्नोलॉजीला हा स्मार्ट युनिफॉर्म तयार करण्यासाठी जवळपास 2 दोन वर्षे लागले. त्यानंतर चीनने या स्मार्ट युनिफॉर्मला जुलै 2017 मध्ये लाँच केले होते.

 

बातम्या आणखी आहेत...