Home | International | China | china-statement-about-dalai-lama

दलाई लामांसाठी चीनची दारे खुली

वृत्तसंस्था | Update - May 20, 2011, 04:55 PM IST

तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांच्यासाठी चीनची दारे खुली आहेत

  • china-statement-about-dalai-lama

    बिजींग - तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांच्यासाठी चीनची दारे खुली आहेत, असे वक्तव्य चीनने केले आहे. परंतु यासाठी लामा यांनी स्वतंत्र तिबेटच्या मागणीचा विचार सोडून द्यावा, असे म्हटले आहे. दरम्यान, लामा यांच्याशी संपर्क झाला नसल्याचेही चीनने स्पष्ट केले आहे. चीनचे तिबेटमधील उच्चाधिकाऱयाने म्हटले आहे की, हे घडू शकते मात्र ते लामा यांच्यावर अवलंबून आहे. त्यांना जर चीनमध्ये परतण्याची इच्छा असेल तर ते खुशाल येऊ शकतात. आम्ही त्यांचे स्वागत करू. त्यांच्यासाठी दार पूर्ण उघडू, असे सांकेतिकपणे त्यांनी सांगितले.
    चीनने एवढ्या वर्षांत पहिल्यांदाच लामा यांचे स्वागत करणारे वक्तव्य केले आहे. ही घटना अपवादात्मक म्हटली पाहिजे, असे पद्म शोलिंग यांनी म्हटले आहे. स्वतंत्र तिबेट प्रांताचे अध्यक्ष असलेले शोलिंग यांनी पत्रकार परिषदेत चीनच्या या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केले. शोलिंग हे ६ वर्षांपासून स्वतंत्र तिबेटच्या चळवळीत सक्रिय आहेत. दलाई लामांना आता पायघड्या घालण्याची भाषा करणा:या चीनने मागील वर्षी त्यांना मूळ गावी जाण्याची परवानगी नाकारली होती.

Trending