Home | International | China | china-to-increase-expenditure-on-atomic-saftey

आण्विक सुरक्षिततेसाठी १०३ कोटी खर्च करणार चीन

वृत्तसंस्था | Update - May 20, 2011, 11:37 AM IST

चीनने आपल्या आण्विक सुरक्षिततेच्या कार्यक्रमासाठी चालू वर्षात २.३० कोटी डॉलर खर्च करण्याचे ठरविले आहे.

  • china-to-increase-expenditure-on-atomic-saftey

    शांघाई - जपानमध्ये आलेल्या त्सुनामीमुळे तेथील अणुभट्टीत घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर चीनने आपल्या आण्विक सुरक्षिततेच्या कार्यक्रमासाठी चालू वर्षात २.३० कोटी डॉलर (साधारणपणे १०३.१८ कोटी रुपये) खर्च करण्याचे ठरविले आहे. काही दिवसांपूर्वीच संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव बान की मून यांनी अणुऊर्जेचा वापर करणाऱया देशांनी आपल्या अणुभट्ट्यांची सुरक्षिततेची तपासणी करण्याच आवाहन केले होते.

    विकासाच्या नावाखाली देशातील नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आणता येऊ शकणार नाही, असे बान की मून यांनी म्हटले होते. चीनने गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात अणुभट्ट्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही तरतूद केली नव्हती, असे चीनमधील सरकारी वृत्तसंस्था झिन्हुआने म्हटले आहे. आता करण्यात आलेल्या तरतुदीतून अणुभट्ट्यातून होणाऱया किरणोत्सर्गाकडे लक्ष ठेवण्यात येणार आहे.

Trending