आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्टिफिशियल सूर्यनिर्मिती करणार चीन; सूर्यापेक्षा 6 पट जास्त असेल उष्ण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - आर्टिफिशियल चंद्रानंतर अाता चीनने आर्टिफिशियल सूर्याची निर्मिती करण्याचे काम सुरू केले आहे. शास्त्रज्ञांचा दावा आहे की, या सूर्यापासून खऱ्या सूर्यापेक्षाही जास्त उष्णता निर्माण करण्यात आम्हाला यश मिळाले आहे. आर्टिफिशियल सूर्यात त्यांनी १०० दशलक्ष (१० कोटी) डिग्री सेल्सियस तापमानापर्यंत ऊर्जानिर्मिती केली आहे. हा खऱ्या सूर्याच्या पृष्ठभागाच्या तापमान १५ मिलियन (१.५ कोटी)पेक्षाही जास्त आहे. शास्त्रज्ञ या फ्यूजनमध्ये जितकी उष्णता निर्माण करत असल्याचा दावा करत अाहेत ती उष्णता खऱ्या सूर्याच्या तुलनेत सहापट जास्त आहे. अहवालानुसार, चीनच्या हेफेई इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल सायन्सेसचे शास्त्रज्ञ खऱ्या सूर्याप्रमाणेच ऊर्जा तयार करण्याचा साेर्स तयार करत आहेत. शास्त्रज्ञांनी या प्रकल्पास एक्सपेरिमेंटल अॅडव्हान्स्ड सुपरकंडक्टिंग तोकामाक (ईएएसटी) असे नाव दिले आहे. हा एक प्रकारचा न्यूक्लियर फ्यूजन रिअॅक्टर आहे. यात सूर्याप्रमाणेच ऊर्जा तयार होईल. 

 

या प्रकल्पाने जीवाश्म इंधनावर निर्भरता कमी हाेईल 
या प्रकल्पावरून असे म्हटले जाते की, यामुळे जीवाश्म इंधनावर अवलंबून राहणे कमी होत आहे. यापासून निर्माण झालेल्या नाभिकीय ऊर्जेस विशेष तंत्राने पर्यावरणासाठी सुरक्षित ग्रीन ऊर्जेत बदलता येऊ शकते. यामुळे पृथ्वीवर ऊर्जेमुळे वाढणारे संकट दूर होईल. 

बातम्या आणखी आहेत...