आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • China US Trade War: The Possibility Of China Imposing Sovereign Mineral Exports In The United States

चीन-अमेरिका व्यापार युद्ध : अमेरिकेत गौण खनिज निर्यातीला चीन मर्यादा लावण्याची शक्यता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - अमेरिका आणि चीन यांच्या दरम्यान सुरू असलेल्या व्यापारी युद्धादरम्यान गौण खनिज  (रेअर अर्थ मिनरल) अमेरिकेला होणारी निर्यात मर्यादेत करण्याचे संकेत चीनने दिले आहेत. गौण खनिजमध्ये १६ तत्त्वांचा समावेश असतो याचा वापर इलेक्ट्रॉनिक्स, आॅइल रिफायनरी, रिन्युएबल एनर्जी तंत्रज्ञान, ग्लास इंडस्ट्री आदींमध्ये होतो. गौण खनिज जगातील मोजक्या भागात आढळते. याच्या जगातील एकूण उत्पादनांपैकी ७० टक्के उत्पादन चीनमध्ये होते. 


चीनव्यतिरिक्त म्यानमार, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, अमेरिकेसारख्या देशांत उर्वरित ३० टक्के गौण खनिज काढले जाते. चीनने जर अमेरिकेला होणारा पुरवठा कमी केला तर याचा परिणाम अमेरिकी निर्मिती क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. अमेरिका मागणीच्या तुलनेत ८० टक्के गौण खनिज चीनमधून आयात करते. एस्टोनिया, फ्रान्स आणि जपान अमेरिकेला प्रक्रिया केलेले गौण खनिज निर्यात करते. मात्र, अयस्क (ओर) च्या स्वरूपात हे केवळ चीनमधूनच येते. चीनने मर्यादा घातली तर अमेरिकेसमोर मलेशियाचा पर्याय राहील. 
मात्र, चीनमधून ज्या प्रमाणात आयात होते, त्या प्रमाणात मलेशियातून आयात होण्याची शक्यता नाही. गौण खनिज खनन पर्यावरणासाठी नुकसानदायक असल्याचे मानले जाते. यामुळे मलेशियाने याचे उत्पादन कमी करणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे.


अमेरिका स्वत:च रेअर अर्थचे उत्पादन वाढवण्याचाही एक पर्याय आहे. मात्र, मागणी प्रमाणे खनन करण्यासाठी दीर्घ कालावधी लागेल आणि तेव्हापर्यंत अमेरिकेतील उद्योगाची स्थिती कमजोर होण्याची शक्यता आहे. १९८० च्या दशकापर्यंत अमेरिका याचा सर्वात मोठा उत्पादक देश होता. मात्र, पर्यावरणावर परिणाम होत असल्याने अमेरिकेने खनन बंद करून आयातीवर जोर दिला. चीनने आधीही गौण खनिजाची निर्यात कमी केली आहे. २०१० मध्ये चीनने जपानची निर्यात कमी केली होती. गौण खनिज उत्पादनाबरोबरच चीन रिफायनिंगमध्येही सर्वात पुढे आहे. पूर्ण जगभरात जितकी रिफायनिंग होते, त्यातील ९० टक्के 
चीनमध्येच होते.

 

स्मार्टफोनपासून संरक्षणातील उपकरणांपर्यंत वापर
गौण खनिजाची मागणी मागील दशकात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कॉम्प्युटर मेमरी, डीव्हीडी, रिचार्जेबल बॅटरी, स्मार्टफोनचे नवीन कंपोनंटसह संरक्षण क्षेत्राशी संबंधित उपकरणांत याचा उपयोग होतो. आज सुमारे ६०० कोटी मोबाइल फोन जगभरात वापरले जात आहेत. या सर्वांमध्ये रेअर अर्थ मिनरलचा वापर झाला आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीमध्येही याचा वापर होतो. चीनने याच्या निर्यातीवर बंधने घातली तर अमेरिकेला अब्जावधी डॉलरचा झटका बसण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...