आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बीजिंग - चीनमध्ये ६३ दिवस चालणारा विंटर फिशिंग फेस्टिव्हल. शुक्रवारी सुरू झालेल्या या महोत्सवात तीन दिवसांत एक लाखांहून जास्त लोक आले. फेस्टिव्हलमध्ये उणे १५ डिग्री तापमानात उभे राहून लाेकांनी गोठलेल्या तलावातील बर्फ फोडला आणि मासे पकडले. महोत्सवात पहिल्या दिवशी सायंकाळी या माशाचा लिलाव करण्यात आला. यामध्ये १५ किलोचा मासा १ लाख ४५ हजार ५६० डॉलरमध्ये (सुमारे १.०१ कोटी रुपये) विकला गेला. हा आजवरचा विक्रम आहे. कारण या फेस्टिव्हलमध्ये मासा इतका महाग विकला गेला नव्हता. बर्फ तोडण्यासाठी तलावात १०० पेक्षा जास्त छिद्र पाडले. हा महोत्सव डिसेंबर अखेरपर्यंत चालतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.