आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन : १३ लाखांची नाणी घेऊन महिला आली कार घेण्यासाठी; नाणी मोजण्यास लागले ३ दिवस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चीनमधील कांगझोऊ शहरात एक महिला कार विकत घेण्यासाठी शोरुममध्ये गेली होती. तिने सोबत  १५ हजार पाऊंडची (सुमारे १३ लाख रुपये) नाणी आणली होती. ती मोजण्यासाठी शोरुमच्या १७ कर्मचाऱ्यांना तीन दिवस लागले. शोरुमचे मॅनेजर जियाओ यांनी सांगितले, कार विकत घेणारी महिला व्यावसायिक आहे. तिला जी कार घ्यायची हाेती, तिची किंमत १९.५ लाख रुपये होती. ती सोबत नाण्यांनी भरलेल्या ६६ बॅगा आणल्या होत्या. त्यात १३ लाखांची नाणी हाेती. जियोओ यांनी सांगितले, आम्हाला ग्राहकास परत पाठवयाचे नव्हते. यामुळे नाणी मोजण्याचा निर्णय घेण्यात आला. सलग तीन दिवस नाणी मोजण्यास लागली. नाणी मोजताना कर्मचाऱ्यांच्या हाताना काळा रंग लागला होता. महिला म्हणाली, मी व्यावसायिक आहे.  ही नाणी तिची १० वर्षांची बचत हाेती. तिच्याजवळ नोटा नव्हत्या. त्यामुळे नाणी आणली असे ती म्हणाली.